Join us

महिन्याला केवळ ५०० रुपयांच्या गुंतवणूकीवर डबल फायदा, सुरक्षेसह मिळणार जबरदस्त रिटर्न्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 17:02 IST

Aegon Life Insurance: यामध्ये तुम्ही ५०० रुपये प्रति महिनाची किमान गुंतवणूक करू शकता.

तुम्ही गुंतवणुकीसाठी एखादं उत्पादन शोधत असाल जे जोखमही कव्हर करते, परतावा देते आणि स्वस्त देखील आहे, तर एगॉन लाइफ इन्शुरन्स तुमच्यासाठी अत्यंत स्वस्त आणि दुहेरी लाभ बचत योजना iGuarantee Max Savings Plan घेऊन आली आहे. ही योजना केवळ गॅरंटीड टॅक्स फ्री परतावा देत नाही तर तुम्हाला जीवन विमा संरक्षण देखील देते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुम्हाला ते दररोज 17 रुपये किंवा दरमहा 500 रुपये गुंतवणूकीवर मिळू शकते. म्हणजेच, या उत्पादनाच्या मदतीने, जिथे एकीकडे तुमच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित होते, तर दुसरीकडे तुमचे पैसेही वाढत राहतचात. कालांतरानं तुम्ही मोठी रक्कमही जमा करू शकता.

काय आहे विशेष?याची खासियत म्हणजे यात मिळणारं डबल बेनिफिट आगे. यामध्ये तुम्ही 5 वर्षे ते 20 वर्षांपर्यंत पॉलिसी घेऊ शकता. तसंच तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे याच्या प्रीमिअमची रक्कमही निश्चित करू शकता. तुम्हाला यात 500 रुपयांची गुंतवणूकही करता येईल. तुम्हाला मिळणारे बेनिफिट्स हे प्रीमिअमच्या आधारावर निश्चित केले जातील. लाईफ कव्हर आणि गॅरेटिंड सेव्हिंगसोबत तुम्हाला यासोबत एक्सिडेंटल डेथ किंवा क्रिटिकल इलनेसारखे रायडर्सही निवडता येतील.

पॉलिसीच्या कालावधीनुसार सम अशुअर्डसोबत गॅरंटिड एडिशन आणि लॉयल्टी एडिशनचाही तुम्हाला फायदा मिळू शकतो. या प्रोडक्टसोबत किमान 11 टक्क्यांचं कव्हर मिळतं.

कसा मिळेल फायदा?याबाबत कंपनीचे सीईओ आणि एमडी सतीश्वर बी यांनी माहिती दिली. जर तुमचं वय 30 वर्षे असेल आणि तुमच्या मुलाचं/मुलीचं वय 3 वर्षे असेल, तुम्ही महिन्याला त्याच्यासाठी 3 हजार रुपये वेगळे ठेवत असाल तर या प्लानद्वारे 10 वर्षांनी ते 6.5 लाख रुपये होती. काही अनुचित घटना घडली तर मुलाच्या भविष्यासाठी किमान 5 लाख रुपयांची रक्कम मिळेल. जर तुम्ही 40 वर्षांचे आहात आणि रिटायरमेंटचं प्लानिंग करत असाल, तर 10 हजार रुपये प्रति महिन्याच्या गुंतवणूकीनंतर 60 वर्षांचे झाल्यावर तुम्हाला 29 लाख रुपये मिळती. जर कोणतीही अनुचित घटना घडली तर तुमच्या मुलांना किमान 22.8 लाख रुपये मिळतील.

(टीप - या लेखात केवळ गुंतवणूकीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)

टॅग्स :गुंतवणूकव्यवसाय