Join us

Bank of Baroda मध्ये जमा करा २,००,००० रुपये; मिळेल, ₹४७,०१५ चं फिक्स व्याज आणि हमीही, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 10:22 IST

Bank of Baroda Savings Scheme: आरबीआयनं रेपो दरात कपात केल्यानंतर बँक ऑफ बडोदासह सर्व बँकांनी एफडीच्या व्याजदरात कपात केली आहे. मात्र, सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा अजूनही आपल्या ग्राहकांना एफडीवर उत्तम व्याज देत आहे.

Bank of Baroda Savings Scheme: आरबीआयनं रेपो दरात कपात केल्यानंतर बँक ऑफ बडोदासह सर्व बँकांनी एफडीच्या व्याजदरात कपात केली आहे. यंदा रेपो दरात १ टक्के कपात करण्यात आली आहे. मात्र, सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा अजूनही आपल्या ग्राहकांना एफडीवर उत्तम व्याज देत आहे. ही सरकारी बँक एफडीवर ३.५० टक्क्यांपासून ७.२० टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. आज आम्ही तुम्हाला बँक ऑफ बडोदाच्या एका एफडी स्कीमबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये २,००,००० रुपये जमा करून गॅरंटीसह ३०,२२८ रुपयांचं फिक्स्ड व्याज मिळू शकतं.

एफडीवर ७,२० टक्के व्याज

बँक ऑफ बडोदा ही मार्केट कॅपच्या बाबतीत देशातील दुसरी सर्वात मोठी सरकारी बँक आहे. बँक ऑफ बडोदामध्ये ७ दिवस ते १० वर्षांपर्यंत एफडी करता येते. ही सरकारी बँक १ वर्ष ते ३ वर्षांच्या एफडीवर ६.५० टक्के ते ७.१० टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. बँक ४४४ दिवसांच्या एफडीवर सर्वाधिक ६.६० टक्के ते ७.२० टक्के व्याज देत आहे. बँक ऑफ बडोदा सर्वसामान्यांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना ०.५० टक्के आणि अतिज्येष्ठ नागरिकांना ०.६० टक्के अधिक व्याज देतेय.

वीकली एक्सपायरीवर तेजीसह उघडला बाजार; सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला, IT, मेटल शेअर्समध्ये खरेदी

३ वर्षांच्या एफडीवर ४७ हजारांचं व्याज

जर तुम्ही सामान्य नागरिक असाल आणि बँक ऑफ बडोदामध्ये ३ वर्षांच्या एफडीमध्ये २,००,००० रुपये जमा केले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण २,४२,६८१ रुपये मिळतील, ज्यात ४२,६८१ रुपयांच्या फिक्स्ड इंटरेस्टचा समावेश असेल. जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि बँक ऑफ बडोदामध्ये ३ वर्षांच्या एफडीमध्ये २,००,००० रुपये जमा केले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण २,४६,२८७ रुपये मिळतील, ज्यात ४६,२८७ रुपयांच्या फिक्स्ड इंटरेस्टचा समावेश असेल. त्याचप्रमाणे जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि बँक ऑफ बडोदामध्ये ३ वर्षांच्या एफडीमध्ये २ लाख रुपये जमा केले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण २,४७,०१५ रुपये मिळतील, ज्यात ४७,०१५ रुपयांच्या फिक्स्ड इंटरेस्टचा समावेश असेल.

टॅग्स :बँकगुंतवणूक