Join us

Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 12:48 IST

Bank of Baroda Savings Scheme: सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा मार्केट कॅपच्या बाबतीत देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सरकारी बँक आहे. बँक ऑफ बडोदाच्या बचत योजनांवर उत्तम परतावा मिळत आहे.

Bank of Baroda Savings Scheme: सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा मार्केट कॅपच्या बाबतीत देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सरकारी बँक आहे. रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कपात केल्यानंतर बँक ऑफ बडोदानंही बचत योजनांच्या व्याजदरात कपात केली आहे. मात्र, असं असूनही बँक ऑफ बडोदाच्या बचत योजनांवर उत्तम परतावा मिळत आहे. बँक ऑफ बडोदाच्या बचत योजनेत तुम्ही २ लाख रुपये जमा करून ३२,०४४ रुपयांचा निश्चित परतावा मिळवू शकता.

जर तुम्ही बँक ऑफ बडोदाच्या एफडीमध्ये २ वर्षांच्या कालावधीसाठी २ लाख रुपये जमा केले तर तुम्हाला थेट ३२,०४४ रुपयांचा निश्चित परतावा मिळेल. सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या कालावधीच्या एफडी योजनांवर ४.२५ टक्क्यांपासून ७.६५ टक्क्यांपर्यंत बंपर व्याज देत आहे. बँक ऑफ बडोदा २ वर्षांच्या एफडीवर सर्वसामान्यांना ७ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.५० टक्के बंपर व्याज देत आहे.

किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स

३२,०४४ रुपयांचं फिक्स्ड व्याज मिळेल

बँक ऑफ बडोदाच्या २ वर्षांच्या एफडीमध्ये २ लाख रुपये जमा करून ३२,०४४ रुपयांचं निश्चित व्याज मिळवू शकता. ६० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या सामान्य नागरिकानं बँक ऑफ बडोदामध्ये २ वर्षांच्या एफडीमध्ये २,००,००० रुपये जमा केले तर त्याला मॅच्युरिटीवर एकूण २,२९,७७६ रुपये मिळतील. त्यावर २९,७७६ रुपये निश्चित व्याज मिळेल. त्याचप्रमाणे ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकानं त्यात २,००,००० रुपये जमा केल्यास मुदतपूर्तीच्या वेळी त्याला एकूण २,३२,०४४ रुपये मिळतील. यामध्ये निश्चित व्याज म्हणून ३२,०४४ रुपये मिळणार आहेत.

(टीप - यामध्ये केवळ सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :बँकगुंतवणूक