Bank of Baroda Savings Scheme: सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना बचत खात्यांवर उत्तम परतावा देत आहे. दरम्यान, या वर्षी आरबीआयनं रेपो दरात १.०० टक्के कपात केल्यानंतर, मुदत ठेवींवरील व्याजदरही कमी झाले आहेत. परंतु, बँक ऑफ बडोदाचे एफडीवरील व्याजदर अजूनही आकर्षक आहेत. मार्केट कॅपच्या बाबतीत देशातील दुसरी सर्वात मोठी सरकारी बँक आपल्या ग्राहकांना एफडीवर ३.५० टक्के ते ७.२० टक्के व्याज देतेय. आज आपण बँक ऑफ बडोदाच्या अशा एफडी योजनेबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये फक्त १ लाख रुपये जमा करून १५,११४ रुपयांचे निश्चित व्याज मिळू शकतं.
एफडीवर मोठं व्याज
बँक ऑफ बडोदामध्ये ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंत एफडी करता येतात. ही सरकारी बँक ७ ते १४ दिवसांच्या एफडीवर ३.५० टक्के ते ४.०० टक्के व्याज देत आहे. ४४४ दिवसांच्या विशेष एफडी योजनेवर ही बँक सर्वाधिक ६.६० टक्के ते ७.२० टक्के व्याज देत आहे. बँक ऑफ बडोदा १ वर्षाच्या एफडीवर ६.५० टक्के ते ७.०० टक्के व्याज देत आहे. याशिवाय, सामान्य नागरिकांना २ वर्षांच्या एफडीवर ६.५० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना ७.०० टक्के आणि अति ज्येष्ठ नागरिकांना ७.१० टक्के व्याज मिळत आहे.
चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या किंमतीतही झाला बदल; १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार
मिळतंय १५,११४ रुपयांचं फिक्स व्याजजर तुम्ही सामान्य नागरिक असाल आणि बँक ऑफ बडोदामध्ये २ वर्षांच्या एफडीमध्ये १ लाख रुपये जमा केले तर मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण १,१३,७६३ रुपये मिळतील, ज्यामध्ये १३,७६३ रुपये व्याज समाविष्ट आहे. जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि बँक ऑफ बडोदामध्ये २ वर्षांच्या एफडीमध्ये १ लाख रुपये जमा केले तर मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण १,१४,८८८ रुपये मिळतील, ज्यामध्ये १४,८८८ रुपये व्याज समाविष्ट आहे.
त्याचप्रमाणे, जर तुम्ही अति ज्येष्ठ नागरिक (८० वर्षांपेक्षा जास्त वयाचे) असाल आणि बँक ऑफ बडोदामध्ये २ वर्षांच्या एफडीमध्ये १ लाख रुपये जमा केले तर मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण १,१५,११४ रुपये मिळतील, ज्यामध्ये १५,११४ रुपये व्याज समाविष्ट आहे.
(टीप - कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)