Join us
Daily Top 2Weekly Top 5

क्रिप्टो बाजार सूसाट..; अवघ्या २४ तासांत तब्बल ₹११ लाख कोटींचा फायदा, बिटकॉइनची मोठी झेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 18:10 IST

Cryptocurrency Rally: बिटकॉइन-एथेरियममध्ये मोठी वाढ!

Cryptocurrency Rally: मध्यपूर्वेतील तणावामुळे एकीकडे जगभरातील अनेक देश चिंतेत असताना, जागतिक क्रिप्टोकरन्सी बाजारात मात्र मोठी तेजी नोंदवली गेली आहे. अवघ्या २४ तासांत गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे. ग्लोबल मार्केट कॅप सुमारे ५ टक्क्यांनी वाढून २.४१ ट्रिलियन डॉलर्सवरून २.५३ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचले आहे. यामुळे गुंतवणूकदारांनाही सुमारे ०.१२ ट्रिलियन डॉलर्स (११ लाख कोटी रुपयांहून अधिक) नफा झाला.

बिटकॉइन-एथेरियममध्ये मोठी वाढ

या तेजीचा परिणाम प्रमुख क्रिप्टोकरन्सींवरही दिसून आला. Bitcoin मध्ये ५ टक्क्यांहून अधिक वाढ होऊन किंमत सुमारे ७४,५५५ डॉलर्सवर पोहोचली, तर Ethereum मध्ये ८ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ होऊन किंमत २,३७० डॉलर्सपर्यंत गेली.

तेजीमागील प्रमुख कारणे

क्रिप्टो बाजारातील या तेजीमागे तीन महत्त्वाचे घटक कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पहिले म्हणजे, जानेवारीनंतर प्रथमच क्रिप्टो ETPs मध्ये १.१ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली असून, यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. दुसरे म्हणजे, Strategy या कंपनीने अलीकडे १३,९२७ बिटकॉइनची खरेदी केली असून त्यांच्या एकूण बिटकॉइन साठ्यात मोठी वाढ झाली आहे. आणि तिसरे म्हणजे, कच्च्या तेलाच्या किमती १०० डॉलरच्या खाली आल्याने महागाईची चिंता कमी झाल्यामुळे रिस्क असलेल्या क्रिप्टो अॅसेट्समध्ये गुंतवणूक वाढली आहे.

RaveDAO मध्ये विक्रमी उसळी

RaveDAO या क्रिप्टोकरन्सीने सर्वाधिक लक्ष वेधले आहे. यात अवघ्या २४ तासांत सुमारे ४०% वाढ झाली, तर ७ दिवसांत तब्बल ४३८६% ची उसळी पाहायला मिळाली. यामुळे अल्पावधीतच या क्रिप्टोने मोठा परतावा दिला. दरम्यान, Pi Network या क्रिप्टोमध्ये मात्र घसरण झाली आहे. २१ तासांत सुमारे १% घट होऊन किंमत ०.१६४८ डॉलर्सवर आली. दरम्यान, क्रिप्टो बाजारातील तेजी उत्साहवर्धक असली तरी हा बाजार अत्यंत अस्थिर आहे. त्यामुळे गुंतवणूक करताना जोखीम लक्षात घेऊनच निर्णय घ्यावा, असे तज्ज्ञांनी सुचवले आहे.    

(टीप - हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : Crypto Market Surges: ₹11 Lakh Crore Gain in 24 Hours

Web Summary : Global crypto market surges amid Middle East tensions, adding ₹11 lakh crore in 24 hours. Bitcoin and Ethereum see significant gains. Investment inflows, strategic buys, and lower oil prices fuel the rally, but volatility warrants caution.
टॅग्स :क्रिप्टोकरन्सीगुंतवणूक