Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२१,३४१ चं फिक्स व्याज, गॅरंटीसह मिळणार परतावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 08:14 IST

Central Bank of India Saving Scheme: यावर्षी रेपो रेटमध्ये १.२५ टक्क्यांची कपात होऊनही अनेक बँका अजूनही मुदत ठेव (एफडी) खात्यांवर उत्तम व्याज देत आहेत. रिझर्व्ह बँक (RBI) गरजेनुसार रेपो रेटमध्ये बदल करत असते.

Central Bank of India Saving Scheme: यावर्षी रेपो रेटमध्ये १.२५ टक्क्यांची कपात होऊनही अनेक बँका अजूनही मुदत ठेव (एफडी) खात्यांवर उत्तम व्याज देत आहेत. रिझर्व्ह बँक (RBI) गरजेनुसार रेपो रेटमध्ये बदल करत असते. जेव्हा आरबीआय रेपो रेट वाढवते, तेव्हा एफडीचे व्याजदरही वाढतात आणि जेव्हा रेपो रेट कमी केला जातो, तेव्हा एफडीवर मिळणारं व्याजही कमी होतं. आज आम्ही तुम्हाला सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अशा एका एफडी योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये केवळ १ लाख रुपये जमा करून तुम्ही २१,३४१ रुपयांपर्यंत निश्चित व्याज मिळवू शकता.

विविध कालावधीच्या एफडी आणि व्याजदर

सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही एक सरकारी बँक असून ती एफडी खात्यांवर ३.०० टक्के ते ६.८० टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. या बँकेत तुम्ही किमान ७ दिवसांपासून ते कमाल १० वर्षांच्या कालावधीसाठी एफडी खातं उघडू शकता. ही सरकारी बँक ४४४ आणि ५५५ दिवसांच्या विशेष एफडी योजनांवर सामान्य नागरिकांना ६.३० टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ६.८० टक्के इतकं सर्वाधिक व्याज देत आहे. तसंच, ३ वर्षांच्या कालावधीसाठी असलेल्या एफडी योजनेवर सामान्य नागरिकांना ६.०० टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ६.५० टक्के व्याज मिळत आहे.

गुंतवणुकीवर मिळणारा निश्चित परतावा आणि सुरक्षितता

जर तुम्ही सामान्य नागरिक असाल आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ३ वर्षांच्या एफडीमध्ये १ लाख रुपये जमा केले, तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण १,१९,५६२ रुपये मिळतील, ज्यामध्ये १९,५६२ रुपयांचं निश्चित व्याज समाविष्ट असेल. दुसरीकडे, जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि या योजनेत ३ वर्षांसाठी १ लाख रुपये गुंतवले, तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण १,२१,३४१ रुपये मिळतील, ज्यात २१,३४१ रुपयांच्या निश्चित व्याजाचा समावेश आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही सरकारी बँक असल्याने तुमचे पैसे येथे पूर्णपणे सुरक्षित आहेत. एफडी योजनेअंतर्गत मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला तुमची मूळ रक्कम आणि निश्चित व्याज हमीसह परत मिळते.

English
हिंदी सारांश
Web Title : Invest ₹1 Lakh in This Bank, Get Guaranteed High Fixed Interest

Web Summary : Central Bank of India offers attractive FD rates, up to 6.80%. Senior citizens can earn ₹21,341 interest on a ₹1 lakh investment for 3 years. Your money is safe with guaranteed returns.
टॅग्स :सरकारबँकगुंतवणूकआरबीआय रेपो रेटभारतीय रिझर्व्ह बँक