Gold Silver Price Today: लग्नसराईच्या काळात सोने आणि चांदीची मागणी वाढल्यामुळे, आज, बुधवार, २६ नोव्हेंबर रोजी सराफा बाजारात याच्या किमतीत वाढ होत आहे. २२ कॅरेट सोनं जीएसटीसह ११८,८८२ रुपये आणि १८ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ९७,३३८ रुपये झालं. आज, २४ कॅरेट सोन्याची किंमत जीएसटीशिवाय ८८५ रुपयांनी वाढून १२६,००४ रुपये प्रति १० ग्रॅम झाली.
आता २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,२९,७८४ रुपये आहे. तर, चांदी जीएसटीसह प्रति किलो १,६२,५९१ रुपये आहे. आज ती १,५७,८५६ रुपये प्रति किलोवर उघडली, त्यात ३,३६९ रुपयांची वाढ झाली. मंगळवारी, जीएसटीशिवाय चांदी १,५६,३२० रुपये प्रति किलोवर बंद झाली आणि जीएसटीशिवाय सोनं १,२१,१९ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झालं.
आज अर्ध्या किमतीत मिळतोय HDFC AMC चा शेअर; का चर्चेत आहे हा स्टॉक?
आता सोनं १७ ऑक्टोबरच्या १,३०,८७४ रुपयांच्या सर्वोच्च पातळीवरून ४८७० रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर, चांदीच्या किमती १४ ऑक्टोबरच्या १,७८,१०० रुपयांच्या सर्वोच्च पातळीवरून २०२४४ रुपयांनी कमी झाल्या आहेत. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जाहीर करते. एकदा दुपारी १२ वाजता आणि दुसरे संध्याकाळी ५ वाजता.
कॅरेटनुसार सोन्याचे भाव
आज, २३ कॅरेट सोने ८८१ रुपयांनी वाढून १,२५,४९९ रुपये प्रति १० ग्रॅम झाले. जीएसटीमुळे, त्याची किंमत आता १२९,२६३ रुपये झाली आहे, ज्यामध्ये मेकिंग चार्जेस वगळता.
२२ कॅरेट सोन्याची किंमत ८११ रुपयांनी वाढून १,१५,४२० रुपये प्रति १० ग्रॅम झाली, जीएसटीसह ते १,१८,८८२ रुपये झालंय.
१८ कॅरेट सोन्याचा भाव ६६४ रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम ९४,५०३ रुपये झाला आणि जीएसटीसह त्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९७,३३८ रुपये झाली.
१४ कॅरेट सोन्याचा भावही ५१७ रुपयांनी वाढला. तो आज ७३,७१२ रुपयांवर उघडला आणि आता जीएसटीसह ७५,९२३ रुपयांवर आला.
Web Summary : Gold and silver prices are rising amid increased demand due to the wedding season. 24-carat gold rose by ₹885 to ₹1,26,004 per 10 grams (excluding GST). Silver also saw a significant increase, reaching ₹1,62,591 per kg (including GST).
Web Summary : विवाह के मौसम के कारण मांग बढ़ने से सोना और चांदी की कीमतों में वृद्धि हो रही है। 24 कैरेट सोना ₹885 बढ़कर ₹1,26,004 प्रति 10 ग्राम (जीएसटी को छोड़कर) हो गया। चांदी में भी उल्लेखनीय वृद्धि हुई, जो ₹1,62,591 प्रति किलोग्राम (जीएसटी सहित) तक पहुंच गई।