Join us

सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?

By जयदीप दाभोळकर | Updated: May 5, 2025 16:53 IST

Gold Silver Price 5 May: लग्नसराईच्या काळात एक आनंदाची बातमी आहे. विशेषत: जे सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.

Gold Silver Price 5 May: लग्नसराईच्या काळात एक आनंदाची बातमी आहे. विशेषत: जे सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. सोने-चांदीचे दर एक लाखांच्या वर पोहोचल्यानंतर आता ते घसरताना दिसत आहेत. फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलमध्ये विक्रमी तेजी नंतर मे महिन्यात सोन्याच्या दरात घसरण होत आहे. आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम २२० रुपयांची घसरण झाली आहे. आज सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव ९३,७३४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर, चांदी ४०७ रुपयांनी स्वस्त होऊन ९३,७१८ रुपये प्रति किलोवर उघडली. जीएसटीमुळे सोन्याचा भाव आता ९६,५४६ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर चांदीचा भाव ९६,५२९ रुपये प्रति किलो झाला.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (आयबीजेए) सराफा बाजाराचे दर जाहीर केले आहेत, ज्यात जीएसटीचा समावेश नाही. कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकतो. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास, तर दुसऱ्याला सायंकाळी ५ च्या सुमारास दर जारी केले जातात.

मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या

उच्चांकी स्तराहून घसरण

२२ एप्रिल २०२५ रोजी सोन्याचा दर ९९,१०० रुपये प्रति १० ग्रॅम होता. जीएसटीशिवाय सोन्याची ही उच्चांकी किंमत आहे. या उच्चांकी पातळीवरून आतापर्यंत सोने ५३६६ रुपयांनी स्वस्त झाले आहे. ३१ डिसेंबर २०२४ रोजी सोन्याचा भाव ७६,०४५ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा दर ८५,६८० रुपये प्रति किलो होता. या दिवशी सोनं ७५,७४० रुपयांवर बंद झाले. चांदीही ८६,०१७ रुपये प्रति किलो ग्रॅमवर बंद झाली. ३१ जानेवारी २०२५ रोजी सोन्याचा भाव ८२,१६५ रुपये प्रति १० ग्रॅम होता. यंदा सोनं जवळपास १८,००० रुपयांनी तर चांदी ७७०० रुपयांनी महागली आहे.

१४ ते २३ कॅरेट सोन्याचे ताजे दर

आयबीजेएच्या दरानुसार आज २३ कॅरेट सोन्याचा भाव २१९ रुपयांनी घसरून ९३,३५९ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर २२ कॅरेट सोन्याचा सरासरी स्पॉट भाव २०२ रुपयांनी घसरून ८५,८६० रुपये झाला. १८ कॅरेट सोन्याचा भाव १६५ रुपयांनी कमी झाला असून आता तो ७०,३०१ रुपये झाला आहे. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव १२९ रुपयांनी कमी होऊन ५४,८३४ रुपये झाला आहे.

टॅग्स :सोनंचांदी