Join us

Zerodha च्या निखिल कामथ यांनी उद्योजकांसाठी सुरू केला WTF Fund, काय होणार फायदा? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 16:14 IST

पाहा नक्की कोणाला मिळणार या फंडाद्वारे मदत.

Zerodha Nikhil Kamath: ग्राहकांच्या संख्येच्या बाबतीत देशातील सर्वात मोठी ब्रोकरेज फर्म झिरोदाचे (Zerodha) संस्थापक निखिल कामत यांनी तरुण उद्योजकांना निधी उभारण्यास मदत करण्यासाठी WTF फंड सुरू केला आहे. निखिल कामत यांनी अनंत नारायण, राज शामानी आणि किशोर बियाणी यांच्यासह मिळून WTF फंड सुरू केला आहे. याद्वारे २२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या उद्योजकांद्वारे चालवल्या जाणार्‍या दोन व्यवसायांना ४० लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे. आपण एक फंड लाँच करणार असून त्याद्वारे फॅशन, ब्युटी किंवा घरगुती ब्रँडवर लक्ष केंद्रित करण्यासोबतच या उद्योजकांना मदत करेल, असं निखिल कामथ म्हणाले.मेनसा ब्रँडचे संस्थापक अनंत नारायण यांच्यासोबत निखिल कामथ, हाऊस ऑफ एक्सचे संस्थापक राज शामानी आणि फ्यूचर ग्रुपचे सीईओ किशोर बियाणी यांच्याद्वारे केलेल्या फंडिंगच्या मदतीनं डब्ल्युटीएफ फंड दोन विजेत्यांना प्रत्येकी ४० लाख रुपये देणार आहे. झेप्टोचे युवा संस्थापक आदित पलिचा आणि कैवल्य वोहरा यांच्या यशाच्या कहाणीतून तरुण उद्योजकांसाठी निधी उभारण्याची कल्पना सुचल्याचं झिरोदाचे निखिल कामत यांनी सांगितलं. जेव्हा आदित पलिचा आणि कैवल्य वोहरा १८ वर्षांचे असताना त्यांना एका फंडातून ४० लाख रुपयांची मदत मिळाली होती.पॉडकास्टदरम्यान निर्णयडब्ल्युटीएफ फंड लाँच करण्याचा निर्णय निखिल कामत यांच्या पॉडकास्टच्या नव्या एपिसोडदरम्यान घेण्यात आला. नवउद्योजकांना हा आधार देण्यासाठी अनेक दिग्गज एकत्र आल्याचं कामत यांनी म्हटलं. ज्यांना इतर माध्यमातून निधी मिळत नाही, अशा फॅशन, ब्युटी किंवा होम ब्रँड यांसारख्या कोणत्याही उद्योगातील २२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या उद्योजकांना निवडणार आहोत. या पॉडकास्टच्या आधारे त्यांना निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असं कामथ म्हणाले.या चर्चेनंतर चौघांनी मिळून एकूण ८० लाख रुपयांचा निधी तयार केला ज्यामध्ये प्रत्येकानं २० लाख रुपये गुंतवण्याची घोषणा केली.

टॅग्स :व्यवसाय