Join us

YouTuber भुवन बामनं ₹११ कोटींना खरेदी केला आलिशान बंगला, दिल्लीत पॉश परिसरात आहे घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 14:28 IST

सोशल मीडिया स्टार भुवन बाम सध्या नवी दिल्लीत मोठी प्रॉपर्टी खरेदी केल्यामुळे चर्चेत आहे.

सोशल मीडिया स्टार भुवन बाम (Bhuvan Bam) सध्या नवी दिल्लीत मोठी प्रॉपर्टी खरेदी केल्यामुळे चर्चेत आहे. यूट्यूबर, कॉमेडियन, लेखक आणि अभिनेता भुवन बामने दक्षिण दिल्लीतील पॉश भागात असलेल्या ग्रेटर कैलाशमध्ये ११ कोटी रुपयांना एक आलिशान बंगला खरेदी केलाय. सीआरई मॅट्रिक्सला मिळालेल्या कागदपत्रांनुसार, या मालमत्तेच्या विक्री करारावर ७ ऑगस्ट २०२३ रोजी स्वाक्षरी करण्यात आली होती आणि सुमारे ७७ लाख रुपये स्टँप ड्युटी म्हणून भरण्यात आली. २९ वर्षीय भुवन बामची नवी प्रॉपर्टी ग्रेटर कैलास पार्ट-३ मध्ये आहे. त्यांचं एकूण क्षेत्रफळ २,२३३ चौरस फूट आणि जमिनीचे क्षेत्रफळ १,९३७ चौरस फूट आहे.

हा नवा बंगला भुवन बामच्या जुनच्या घराच्या नजीकच आहे. त्या ठिकाणीचं त्याचं कुटुंब राहतं. नव्या बंगल्यात मोठं लिविंग रुम, चार बेडरुम, मॉडर्न किचन, डायनिंग एरिया, टेरेस आणि मोठा लॉन आहे. याच्याशिवाय २ कार्स पार्क करण्यासाठी मोठी जागाही आहे.

देशातील मोठ्या युट्युबर्समध्ये भुवन बामचं नाव येतं. युट्युबवर त्याचे २ कोटींपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. याशिवाय त्याचं कॉमेडी चॅनल्स, बीबी री वाईन्स तरुणांमध्ये अधिक प्रसिद्ध आहे. भुवन बामनं कॉमेडीशिवाय गाण्यातही आपलं  नशीब आजमावलंय. तो एक साँगरायटरही आहे. 

टॅग्स :यु ट्यूब