मुंबई : क्रेडिट कार्ड, वैयक्तिक कर्ज यांसारख्या विनाहमी किरकोळ कर्जांत थकबाकीचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे, अशी माहिती आरबीआयने दिली आहे. एकूण किरकोळ कर्ज थकबाकीपैकी निम्म्याहून अधिक हिस्सा विनाहमी कर्जांचा आहे. कर्ज पोर्टफोलिओत विनाहमी कर्जाचा वाटा ७०% पेक्षा जास्त असून, ३५ वर्षांखालील कर्जदारांचा वाटा ५०% पेक्षा जास्त आहे सप्टेंबर २०२४ - सप्टेंबर २०२५ दरम्यान कर्ज वाढ ३६ टक्के इतकी आहे.
विनाहमीचा एनपीए किती?१.८% विनाहमी किरकोळ१.१% एकूण किरकोळ
विना गॅरंटी कर्ज थकबाकीबँक गट थकबाकीचा हिस्साखासगी क्षेत्रातील बँका ७६%अनुसूचित व्यावसायिक बँका ५३.१%सार्वजनिक क्षेत्रातील बँका १५.९%
धोक्याची घंटा का आहे?आरबीआयने फिनटेक कंपन्यांच्या भूमिकेचाही उल्लेख केला आहे. पाच किंवा त्याहून अधिक संस्थांकडून विना हमी कर्ज घेतलेल्या कर्जदारांमध्ये कर्जफेडीची अडचण आहे.
खासगी बँकांमध्ये विनाहमी कर्जाचा ताण सरकारी बँकांच्या तुलनेत कमालीचा (जवळपास ५ पटीने) जास्त आहे. बँका आणि फिनटेक कंपन्या आता वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट कार्डावर अधिक अवलंबून असल्याचे समोर आले आहे.
बँकांच्या पातळीवर विना हमी किरकोळ कर्जवाढीचे संकेत पुन्हा दिसत असताना, मोठ्या कंपन्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जात अजूनही मंदी असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.
Web Summary : RBI warns unsecured retail loan defaults are rising, especially among young borrowers. Private banks face higher stress than public sector banks. Fintech's role in multiple loans raises concerns about repayment difficulties. Corporate lending remains slow, contrasting with unsecured retail growth.
Web Summary : आरबीआई ने चेतावनी दी है कि असुरक्षित खुदरा ऋण चूक बढ़ रहे हैं, खासकर युवा उधारकर्ताओं के बीच। सार्वजनिक क्षेत्र के बैंकों की तुलना में निजी बैंकों को अधिक तनाव का सामना करना पड़ रहा है। कई ऋणों में फिनटेक की भूमिका पुनर्भुगतान कठिनाइयों के बारे में चिंता बढ़ाती है। असुरक्षित खुदरा विकास के विपरीत, कॉर्पोरेट ऋण धीमा है।