Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुमचा आधार पुन्हा एकदा बदलणार; आता ना नाव असेल ना पत्ता, फक्त फोटोसोबत असेल QR कोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 12:13 IST

Aadhaar Card Update: आजच्या काळात आधारकार्ड किती महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला माहीतच आहे. तुमच्या सर्व आर्थिक व्यवहारांसाठी आधारकार्डशिवाय पर्याय नाही.

Aadhaar Card Update: आजच्या काळात आधारकार्ड किती महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला माहीतच आहे. तुमच्या सर्व आर्थिक व्यवहारांसाठी आधारकार्डशिवाय पर्याय नाही. इतकं महत्त्वाचं कागदपत्र असल्यामुळे, त्याचा गैरवापर होण्याचा धोकाही मोठा आहे. हा धोका लक्षात घेऊन, तुमच्या आधारकार्डला अधिक सुरक्षित करण्यासाठी सरकारनं पुन्हा एकदा बदल करण्याची तयारी दर्शवली आहे.

आगामी नवीन आधारकार्डवर फक्त तुमचा फोटो आणि एक क्यूआर कोड (QR Code) असेल. यामध्ये सध्या छापलेले नाव, पत्ता आणि आधार क्रमांक यांसारखे तपशील काढून टाकले जातील. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण लोकांच्या माहितीचा गैरवापर रोखण्यासाठी आणि ऑफलाइन पडताळणीला प्रोत्साहन मिळू नये यासाठी, कार्डधारकाच्या फोटोसह आणि क्यूआर कोडसह आधारकार्ड जारी करण्यावर विचार करत आहे.

आधार पडताळणीवर नियम काय?

आधार अधिनियमानुसार, कोणत्याही व्यक्तीचा आधार क्रमांक किंवा बायोमेट्रिक माहिती ऑफलाइन पडताळणीसाठी जमा केली जाऊ शकत नाही, वापरली जाऊ शकत नाही किंवा संग्रहित केली जाऊ शकत नाही. तरीसुद्धा अनेक संस्था, जसे की हॉटेल, कार्यक्रम आयोजक इत्यादी, आधारकार्डच्या फोटोकॉपी गोळा करतात आणि स्टोअर करतात. यामुळे त्यांच्यासोबत फसवणूक होण्याची किंवा या आधार माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता कायम राहते. यापासून बचाव करण्यासाठी, आधारमधील सर्व माहिती आता गोपनीय ठेवण्याची तयारी सुरू आहे, जेणेकरून ऑफलाइन पडताळणी थांबवून लोकांच्या माहितीचा गैरवापर रोखता येईल.

पडताळणीमध्ये नियमांचे उल्लंघन

आधार कायद्यानुसार, एखाद्या व्यक्तीचा आधार क्रमांक किंवा बायोमेट्रिक माहिती ऑफलाइन पडताळणीसाठी एकत्र केली, वापरली किंवा साठवली जाऊ शकत नाही. तरीही, अनेक संस्था आधार कार्डच्या छायाप्रती गोळा आणि साठवतात. यामुळे फसवणूक किंवा गैरवापर होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी, सर्व आधार माहिती आता गोपनीय ठेवली जात आहे, जेणेकरून ऑफलाइन पडताळणीवर बंदी घालून, वैयक्तिक माहितीचा गैरवापर रोखता येईल.

कुमार म्हणाले, "यावर विचार केला जात आहे की कार्डवर इतर कोणत्याही तपशीलाची गरज काय आहे. त्यावर फक्त फोटो आणि क्यूआर कोड असावा. जर आम्ही आणखी माहिती छापली, तर लोक तीच खरी मानतील आणि ज्यांना गैरवापर करायचा आहे, ते तो करत राहतील." याचा अर्थ असा की, आता आधारकार्डवर फक्त तुमचा फोटो आणि एक क्यूआर कोड असेल, ज्यामध्ये तुमची सर्व माहिती गोपनीयपणे सुरक्षित राहील आणि त्याचा गैरवापरही होणार नाही.

आधार पडताळणीचे नियम काय?

  • देशात आधारची पडताळणी धारकाच्या सहमतीशिवाय केली जाऊ शकत नाही.
  • कोणतीही संस्था असं केल्यास, तिच्यावर ₹१ कोटींपर्यंतचा दंड लावला जाऊ शकतो.
  • ही सहमती बायोमेट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपातच घेतली जाईल, जी धारकाकडून ओटीपी, फिंगरप्रिंट, आयरिस इत्यादीद्वारे घेतली जाऊ शकते.
  • फक्त UIDAI द्वारे अधिकृत संस्था आणि बँकाच आधारची पडताळणी करू शकतात.
  • युजरला हवं असल्यास, तो आपला बायोमेट्रिक डेटा लॉक करू शकतो आणि तेव्हा फक्त ओटीपीच काम करेल.
  • जर कोणी आधारच्या डेटाचा गैरवापर केला, तर त्याच्यावरही मोठा दंड लावला जाऊ शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Aadhaar to change again: No name, address, just QR code.

Web Summary : Aadhaar cards will soon feature only a photo and QR code, omitting name, address, and Aadhaar number to enhance security and prevent misuse. Offline verification rules are strict, with hefty penalties for violations. UIDAI authorized entities only can verify. Users can lock biometric data.
टॅग्स :आधार कार्डसरकार