Join us  

पतंजली पाच लाख तरुणांना देणार रोजगार; अर्थसंकल्पानंतर बाबा रामदेव यांची मोठी घोषणा

By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 02, 2021 8:23 AM

ज्या पद्धतीने इंडोनेशिया आणि मलेशियावरून आपल्याला पॉम मागवावे लागते, त्याचे उत्पादन भारतातच वाढले, तर देशाचे दोन लाख कोटी रुपये वाचतील आणि पाच लाखहून अधिक लोकांना तर स्वतः स्वामी रामदेवच पतंजलीच्या माध्यमाने रोजगार देतील,

ठळक मुद्देआरोग्याच्या दृष्टीने 137 टक्क्यांच्या वाढीसर 2 लाख 32 हजार कोटी रुपयांचे बजेट स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाचदेशात पॉम ऑईलचे उत्पादन वाढल्यानंतर पतंजली पाच लाख लोकांना रोजगार देईल.बाबा रामदेव यांचे म्हणणे आहे, की या अर्थसंकल्पात सर्वांसाठीच काही ना काही आहे.

नवी दिल्ली - योग गुरू बाबा रामदेव यांनी केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प सर्व समावेशक असल्याचे म्हटले आहे. एढेच नाही, तर आरोग्याच्या दृष्टीने 137 टक्क्यांच्या वाढीसर 2 लाख 32 हजार कोटी रुपयांचे बजेट स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच घोषित झाले आहे. याच बरोबर, देशात पॉम ऑईलचे उत्पादन वाढल्यानंतर पतंजली पाच लाख लोकांना रोजगार देईल, असेही बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. 

इंफ्रास्ट्रक्चरच्या माध्यमाने देशाच्या विकासाला गती मिळते. गावाकडे राहणाऱ्या लोकांसाठी हा अर्थसंकल्प अत्यंत महत्वपूर्ण आहे. जल जीवन अभियान, शेतकऱ्यांना एमएसपी, मंड्यांचे आधुनिकीकरण किंवा अॅग्रीकल्चर इंफ्रास्ट्रक्चर विकिसित करणे, सरकारने सर्वच गोष्टींचा विचार केला आहे. रामदेव म्हणाले, सरकार भविष्यात सर्वसामान्यांसाठी निश्चितपणे काहीना काही पावले उचलेल. एकूणच बोलायचे, तर हा अर्थसंकल्प अत्यंत संतुलित तसेच प्रोग्रेसिव्ह आहे.

सरकार आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने पावले टाकत आहे. मग, इम्पोर्ट ड्यूटी वाढविणे असो किंवा देशात खाद्य तेलांपासून ते विविध प्रकारचे मॅन्यूफॅक्चरिंग वाढविणे असो. भारताला जगातील सर्वात मोठे मॅन्यूफॅक्चरिंग बनविण्याचे पंतप्रधान मोदींचे स्वप्न पूर्ण झाले, तर लक्ष्यावधी, कोट्यवधी लोकांना रोजगार मिळेल. रामदेव म्हणाले, मी स्वतः आजवर पाच लाख लोकांना रोजगार दिला आहे. ज्या पद्धतीने इंडोनेशिया आणि मलेशियावरून आपल्याला पॉम मागवावे लागते, त्याचे उत्पादन भारतातच वाढले, तर देशाचे दोन लाख कोटी रुपये वाचतील आणि पाच लाखहून अधिक लोकांना तर स्वतः स्वामी रामदेवच पतंजलीच्या माध्यमाने रोजगार देतील, असेही बाबा रामदेव म्हणाले. बाबा रामदेव यांचे म्हणणे आहे, की या अर्थसंकल्पात सर्वांसाठीच काही ना काही आहे. ते म्हणाले, इम्पोर्ट ड्यूटी वाढविण्याबरोबरच देशात वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्य तेलांचे उत्पादन, तसेच इतर गोष्टींचे उत्पादन वाढविल्यास देश आत्मनिर्भर बनेल. तसेच यामुळे देशाला मॅन्यूफॅक्चरिंग हब बनवविण्याचे मोदींचे स्वप्न पूर्ण झाल्यास, यातून अनेकांना रोजगार मिळेल.

टॅग्स :बजेट 2021रामदेव बाबापतंजलीतेल शुद्धिकरण प्रकल्पकर्मचारी