प्रसिद्ध उद्योजक बिल गेट्स पुन्हा एकदा जेफ्री एपस्टीनशी संबंधित वादाने पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. हे प्रकरण समोर अल्यानंतर गेट्स यांनी आता जाहीर माफी मागितली असून, दोन रशियन महिलांशी आपले संबंध होते, याची कबूल दिली आहे. नुकत्याच समोर आलेल्या नवीन दस्तऐवजांनंतर, वाढलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, गेट्स यांनी 'बिल गेट्स फाउंडेशन'च्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्याकडून "मोठी चूक" झाली असल्याचे मान्य करत कर्मचाऱ्यांचीही माफी मागितली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अंतर्गत टाउनहॉल मीटिंगमध्ये गेट्स म्हणाले, एपस्टीनसोबत वेळ घालवणे आणि फाउंडेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्याच्याशी ओळख करून देणे, ही आपली मोठी चूक होती. यामुळे संस्थेतील लोकांना जी असुविधा झाली, त्याची सर्व जबाबदारी आपण स्वीकारत आहोत. एपस्टीन फाईल्समध्ये उल्लेख असलेल्या दोन रशियन महिलांशी आपले खाजगी संबंध होते, हे त्यांनी मान्य केले; मात्र या संबंधांचा एपस्टीनच्या पीडितांशी कसलाही संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
"बेकायदेशीर काहीच केलं नाही" -अमेरिकन न्याय विभागाशी संबंधित कागदपत्रे आणि फोटो सार्वजनिक झाल्यानंतर हा वाद पुन्हा उफाळून आला. माध्यमांतील वृत्तांनुसार, "मी काहीही बेकायदेशीर केलेले नाही आणि असे काही पाहिलेलेही नाही," असेही गेट्स यांनी कर्मचाऱ्यांशी बोलताना म्हटले आहे.
सार्वजनिक कार्यक्रमांवरही परिणाम -महत्वाचे म्हणजे, या वादाचा परिणाम गेट्स यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांवरही झाला आहे. गेट्स यांनी भारतात आयोजित 'AI इम्पॅक्ट समिट 2026' साठी येण्याचा कार्यक्रमही रद्द केला. तत्पूर्वी, आपला एपस्टीनसोबत कसल्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार नव्हता, असे गेट्स फाउंडेशनने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
Web Summary : Bill Gates apologized to his foundation's staff for his association with Jeffrey Epstein and admitted to having relationships with two Russian women. He maintains no illegal activity occurred and that these relations had nothing to do with Epstein's victims. His actions impacted public events.
Web Summary : बिल गेट्स ने जेफरी एपस्टीन के साथ अपने संबंधों के लिए माफी मांगी और दो रूसी महिलाओं के साथ संबंध स्वीकार किए। उन्होंने कहा कि कोई अवैध गतिविधि नहीं हुई और इन संबंधों का एपस्टीन के पीड़ितों से कोई संबंध नहीं है। इससे सार्वजनिक कार्यक्रमों पर असर पड़ा।