Join us

भारतातील विद्युतीकरणाची जागतिक बँकेकडून प्रशंसा, ८५ टक्के लोकसंख्येपर्यंत पोहचवली वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 01:38 IST

विद्युतीकरणाच्या क्षेत्रात भारत अत्यंत चांगले काम करीत असून, जवळपास ८५ टक्के लोकसंख्येपर्यंत आता वीज पोहोचली आहे, असे गौरवोद्गार जागतिक बँकेने काढले आहेत.

वॉशिंग्टन - विद्युतीकरणाच्या क्षेत्रात भारत अत्यंत चांगले काम करीत असून, जवळपास ८५ टक्के लोकसंख्येपर्यंत आता वीज पोहोचली आहे, असे गौरवोद्गार जागतिक बँकेने काढले आहेत.भारताने २0१0 ते २0१६ या काळात दरवर्षी तब्बल ३0 दशलक्ष लोकांपर्यंत वीज पोहोचविली आहे. हे प्रमाण जगातील अन्य कोणत्याही देशाच्या तुलनेत अधिक आहे, असे जागतिक बँकेने ताज्या अहवालात म्हटले आहे.जागतिक बँकेच्या मुख्य ऊर्जा अर्थतज्ज्ञ व्हिव्हियन फॉस्टर यांनी सांगितले की, भारताच्या १.२५ अब्ज लोकसंख्येपैकी १५ टक्के लोकसंख्येला अद्यापही वीज मिळालेली नाही. त्यांच्यापर्यंत वीज पोहोचवणे हे मोठे आव्हान आहे. सर्वांपर्यंत वीज पोहोचविण्यासाठी २0३0 ची मुदत ठरविलेली असली, तरी भारत हे उद्दिष्ट त्याआधीच गाठेल, असे दिसते.भारतातील सर्व गावांत वीज पोहोचविण्यात आल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर आठवडाभरातच जागतिक बँकेचा हा अहवाल आला आहे.जागतिक बँकेची सर्वेक्षणाची पद्धत कुटुंबावर आधारित आहे. त्यामुळे ग्रीडच्या बाहेरील लोकही जागतिक बँकेच्या सर्वेक्षणात मोजले जातात. सरकारी आकडेवारी वापर जोडण्यावर आधारित असते. भारताचे या क्षेत्रातील काम खरोखरच अद्वितीय आहे. वर्षाला ३0 दशलक्ष लोकांपर्यंत वीज पोहोचवणे ही कामगिरी आश्चर्यकारकच आहे. असे असले तरी विद्युतीकरणाच्या गतीच्या बाबतीत भारत अव्वल नाही. बांगलादेश आणि केनिया या देशांची विद्युतीकरणाची गती भारतापेक्षा जास्त आहे.सरकारी दाव्याहून अधिकफॉस्टर यांनी म्हटले की, तुम्हाला धक्का बसेल, पण आमचा आकडा सरकारी आकड्यापेक्षा मोठा आहे. आमच्या माहितीनुसार, भारतातील ८५ टक्के लोकसंख्येपर्यंत वीज पोहोचविण्यात भारत सरकार यशस्वी ठरले आहे. सरकारी आकड्यानुसार ८0 टक्के लोकांपर्यंत वीज पोहोचली आहे. 

टॅग्स :भारतवीजवर्ल्ड बँक