Join us
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या प्रतिभेचा अद्यापही याेग्य वापर होत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2020 02:17 IST

वाधवानी फाउण्डेशन : देशात २५ टक्केच महिला मनुष्यबळ; उद्याेजिकांना संधीची गरज

काेलकाता : जगाच्या मनुष्यबळाच्या तुलनेत भारतात फक्त २५ टक्केच महिलांचा वाटा आहे. वाढत्या औद्याेगिकरणामध्ये भारतात महिला मागे राहिल्या असून, त्यांच्या प्रतिभेचा याेग्य वापर हाेत नसल्याचे मत वाधवानी फाउण्डेशनने व्यक्त केले.

महिला उद्याेजकता दिनानिमित्त वाधवानी फाउण्डेशनचे सीईओ अजय केला यांनी सांगितले, की देशात ६.३ काेटी लघु आणि मध्यम उद्याेग आहेत. त्यापैकी केवळ ६ टक्के उद्याेग महिलांचे आहेत. उद्याेजकतेमध्ये महिलांचा वाटा केवळ १४ टक्के आहे. महिला मागे राहिल्या हे स्पष्ट आहे. महिलांमध्ये प्रचंड क्षमता आहे. परंतु, त्याचा उपयाेग केला जात नाही. महिला उद्याेजिकांच्या प्रतिभेचा वापर करण्याची देशापुढे एक चांगली संधी आहे. ग्रामीण भारतावर समान लक्ष पुरवून महिला उद्याेजिकांना एकात्मिक धाेरणान्वये साह्य केले पाहिजे. महिलांमध्ये काही नैसर्गिक गुण असतात. याचा फायदा उद्याेजकता विकासामध्ये हाेऊ शकताे.

राेजगारनिर्मितीसाठी फायदाअलीकडच्या काळात उद्याेगक्षेत्रात कुशल मनुष्यबळाची कमतरता दिसून येते. अशा स्थितीत महिलांना संधी मिळाल्यास भारतीय अर्थव्यवस्था आणि राेजगारनिर्मितीसाठी फायदा होऊ शकताे, असे केला यांनी सांगितले.  अमेरिकेतील उद्याेजक डाॅ. राेमेश वाधवानी यांनी फाउण्डेशन’ची स्थापना केली.

टॅग्स :महिलाएमआयडीसीव्यवसाय