Join us  

विप्रोच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नवागतांच्या वेतनात ३० हजारांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 3:16 AM

आयटी क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी विप्रोने नवागतांच्या (फ्रेशर) वार्षिक वेतनात ३० हजार रुपयांची वाढ केली आहे.

बंगळुरू : आयटी क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी विप्रोने नवागतांच्या (फ्रेशर) वार्षिक वेतनात ३० हजार रुपयांची वाढ केली आहे. त्यांचे वेतन ३.२ लाख रुपयांवरून ३.५ लाख रुपये करण्यात आले आहे. विप्रोचे मुख्य मनुष्यबळ विकास अधिकारी सौरभ गोविल म्हणाले, भरतीची गुणवत्ता वाढावी यासाठी आम्ही राष्ट्रीय पातळीवर कोडिंगची परीक्षाही घेणार आहोत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा आम्ही २५ ते ३० टक्के जास्त भरती करणार आहोत.इतर अनेक आयटी कंपन्यांनी याआधीच नवागतांना अधिक वेतन व राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा ही पावले उचलली आहेत. टीसीएस व इन्फोसिस यांचा त्यात समावेश आहे. या कंपन्या कोडिंगची अधिक चांगली कौशल्ये असलेल्या नवागतांना अधिक वेतन देत आहेत.विप्रोच्या कॅम्पस मुलाखती तीन टप्प्यांत आहेत. पहिल्या टप्प्यात कंपनी आयआयटीसारख्या स्टार महाविद्यालयातून भरती करते. येथील नवागतांना १२ लाखांपर्यंत वेतन दिले जाते. त्यानंतर टर्बो प्रोग्राम अंतर्गत भरती होते. यात ६.५ लाख ते ७ लाखांपर्यंत वेतन दिले जाते. त्यानंतर नेहमीची भरती होते. (वृत्तसंस्था)

टॅग्स :पैसा