Join us

पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढणार? आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 20:29 IST

Crude Oil Price Hike : युरोपियन युनियनने (European Union) रशियाकडून कच्च्या तेलाच्या आयातीवर बंदी घालण्याचे समर्थन केल्याने कच्च्या तेलाच्या किमती सात आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत.

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत  (Crude Oil Price) पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळत आहे. युरोपियन युनियनने (European Union) रशियाकडून कच्च्या तेलाच्या आयातीवर बंदी घालण्याचे समर्थन केल्याने कच्च्या तेलाच्या किमती सात आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. ब्रेंट कच्च्या तेलाची (Brent Crude Oil) किंमत प्रति बॅरल 115 डॉलरच्या पुढे गेली आहे, जी 28 मार्चनंतरची सर्वोच्च आहे.

यापूर्वी रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत 2008 नंतर प्रथमच 139 डॉलर प्रति बॅरलची सर्वोच्च पातळी गाठली होती. रशियातून कच्च्या तेलाच्या आयातीवर बंदी घालण्याच्या मागणीमुळे दरात वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे चीनमध्ये कोरोनामुळे लागू करण्यात आलेला लॉकडाऊन शिथिल झाल्याच्या बातम्यांमुळे कच्च्या तेलाच्या किमतीही वाढल्या आहेत. दरम्यान, चीनमध्ये लॉकडाऊन शिथिल केल्यास कच्च्या तेलाची मागणी वाढेल आणि पुरवठ्याअभावी किमती आणखी वाढू शकतात.

पुन्हा पेट्रोलडिझेलच्या दरात वाढ होऊ शकतेदरम्यान, भारतासाठी ही वाईट बातमी आहे. भारतात, 22 मार्च ते 6 एप्रिल 2022 दरम्यान पेट्रोलडिझेल आधीच 10 रुपये प्रति लिटरने महागले आहे. मात्र कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या तर पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली तर देशातील महागाई आणखी वाढू शकते. वाढत्या महागाईमुळे आधीच सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. 

टॅग्स :पेट्रोलडिझेलखनिज तेलव्यवसाय