Join us  

फेसबुक नावासोबतच आणखी काय काय बदलणार? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 6:10 AM

जगभरात अब्जावधी वापरकर्ते असलेल्या फेसबुकने आता स्वत:च्या नावात बदल करण्याचे ठरवले आहे. २८ ऑक्टोबर रोजी कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे.

जगभरात अब्जावधी वापरकर्ते असलेल्या फेसबुकने आता स्वत:च्या नावात बदल करण्याचे ठरवले आहे. २८ ऑक्टोबर रोजी कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. त्यात नाव बदलण्यासंदर्भातील घोषणा होऊ शकते, असे म्हटले जात आहे. नाव बदलण्याच्या या प्रक्रियेला रिब्रॅण्ड असे म्हटले जाते. काय बदलणार?फेसबुक रिब्रॅण्डिंगच्या माध्यमातून इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप आणि ऑक्युलस यांसारखे सर्व ॲप्स एकाच छताखाली आणण्याचा विचार करत आहे. संस्थापक मार्क झुकेरबर्गने अलीकडेच यासंदर्भात सूतोवाच केले होते. झुकेरबर्ग म्हणाला होता की, फेसबुक आता एक पाऊल पुढे टाकणार असून भविष्यात मेटावर्स कंपनी म्हणून ओळखली जाईल.फेसबुकचे नाव बदलल्यानंतर त्याच्या बोधचिन्हातही बदल होण्याची चिन्हे आहेत. मेटावर्स काय आहे?मेटावर्स म्हणजे ज्यात रिॲलिटी आणि व्हर्च्युअल वर्ल्ड यांचा मेळ पहिल्यापेक्षा कैकपटींनी अधिक असतो. व्हर्च्युअल रिॲलिटीची पुढची पायरीच.या प्रकारात मीटिंग, हिंडणे-फिरणे, गेमिंग अशी कितीतरी कामे करता येतात. मात्र, हे सर्व विकसित करण्यासाठी काही ठरावीक कालावधी जाऊ द्यावा लागतो. किमान १५ वर्षे तरी लागणार आहेत यासाठी.मेटावर्स डेव्हलपमेंटसाठी फेसबुक १० हजार लोकांची भरती करणार आहे. फेसबुकने त्यासाठी फ्रान्समध्ये ऑग्मेंटेड रिॲलिटी रिसर्च लॅब सुरू केली आहे. आतापर्यंत यांनी बदलली नावे...स्वत:चे नाव बदलणारी फेसबुक ही पहिलीच कंपनी नसेल. याआधी गुगलनेही स्वत:चे नाव बदलले आहे. गुगलचे सुरुवातीचे नाव बॅकरब होते. ते नंतर बदलण्यात आले. स्नॅपइंक या कंपनीचे २०१६ मध्ये स्नॅपचॅट असे नामकरण करण्यात आले.

टॅग्स :मार्क झुकेरबर्गफेसबुक