Join us

दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत उद्या बँका बंद राहणार का, पाहा काय म्हटलंय RBI नं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 16:05 IST

येत्या काळात अनेक सण येत आहेत. अशा परिस्थितीत येत्या काळात बँकाही अधिक बंद राहणार आहेत. जर तुम्ही काही कामासाठी बँकेत जाण्याचा विचार करत असाल तर प्रथम तुम्हाला बँकेच्या सुट्टीबद्दल माहिती असणं आवश्यक आहे.

येत्या काळात अनेक सण येत आहेत. अशा परिस्थितीत येत्या काळात बँकाही अधिक बंद राहणार आहेत. जर तुम्ही काही कामासाठी बँकेत जाण्याचा विचार करत असाल तर प्रथम तुम्हाला बँकेच्या सुट्टीबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयनं बँक सुट्ट्यांची यादी आधीच जाहीर केली आहे. अशा परिस्थितीत बँकेत जाण्यापूर्वी तुमच्या शहरातील बँक सुट्ट्यांविषयी नक्कीच जाणून घ्या. उद्या म्हणजेच शुक्रवार, ५ सप्टेंबर रोजीही देशातील अनेक शहरांमध्ये बँका बंद राहणार आहेत. आरबीआयनं ५ सप्टेंबर रोजी बँकांना कोणत्या शहरांमध्ये सुट्टी दिली आहे जाणून घेऊ.

५ सप्टेंबर रोजी बँकांना सुट्टी

उद्या म्हणजेच ५ सप्टेंबर रोजी आरबीआयने ईद-ए-मिलाद-उन-नबी आणि ओणम सणामुळे अनेक शहरांमधील बँकांना सुट्टी दिली आहे. शुक्रवार, ५ सप्टेंबर रोजी अहमदाबाद, आईजॉल, इंफाळ, कानपूर, कोच्ची, चेन्नई, जम्मू, तिरुअनंतपुरम, डेहराडून, नागपूर, बंगळुरू, बेलापूर, भोपाळ, मुंबई, रांची, लखनौ, विजयवाडा, श्रीनगर आणि हैदराबाद येथे ईद-ए-मिलाद-उन-नबी आणि ओणम सणानिमित्त बँका बंद राहतील.

Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या

ऑनलाइन सेवा सुरू राहतील

या दिवशी बँका बंद असल्या तरी, याचा अर्थ असा नाही की तुम्ही कोणतंही बँकिंग काम करू शकणार नाही. डिजिटल बँकिंग सेवा सुरू राहतील. यामध्ये UPI, NEFT, RTGS, IMPS आणि ATM सारख्या डिजिटल सेवांचा समावेश आहे, ज्या पूर्वीप्रमाणेच उपलब्ध असतील. यामुळे तुम्हाला पैशांचे व्यवहार सहज करता येतील. परंतु जर तुम्हाला काही महत्त्वाच्या कागदपत्रांची कामं पूर्ण करायची असतील, तर या तारखा लक्षात ठेवणं आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येऊ नये.

टॅग्स :बँकभारतीय रिझर्व्ह बँक