नवी दिल्ली : रोजच्या आर्थिक व्यवहारांसाठी क्रेडिट कार्डचा वापर अनेक जण करतात. कार्डवरील रकमेची वेळेवर चुकवणी करूनही अनेक जणांच्या क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम झालेला असतो.
हा स्कोअर न सुधारण्यामागे कार्डवरील खर्चाच्या मर्यादेच्या ३० टक्के अधिक खर्च हे प्रमुख कारण असते. हा खर्च १५ टक्केपेक्षा अधिक नसावा. उदाहरणार्थ दीड लाखांची मर्यादा असल्यास खर्च ४५ हजारांपेक्षा अधिक नसावा.
एकाचवेळी अनेक कार्ड वापरू नये. एक कार्ड बंद करून लगेच दुसरे घेतले, तर तुम्ही क्रेडिट व्यवहारात सातत्य न ठेवल्याने स्कोअर कमी होत असतो.