Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 15:26 IST

पाकिस्तान आणि चीनची मैत्री कोणापासूनही लपून राहिलेली नाही. चीननं मैत्री कायम ठेवून पाकिस्तानला अनेकदा मदत केली आहे. पण तुम्हाला माहित आहे का चीन पाकिस्तानकडून सर्वात जास्त काय खरेदी करतो?

पाकिस्तान आणि चीनची मैत्री कोणापासूनही लपून राहिलेली नाही. चीननं मैत्री कायम ठेवून पाकिस्तानला अनेकदा मदत केली आहे. पण तुम्हाला माहित आहे का चीन पाकिस्तानकडून सर्वात जास्त काय खरेदी करतो? तसे नसेल तर तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, चीन पाकिस्तानकडून सर्वाधिक गाढवे खरेदी करतो. अलीकडच्या काळात गाढवांची संख्या झपाट्याने वाढली आहे. ही वाढ योगायोग नसून एक मोठा आंतरराष्ट्रीय व्यापार करार आणि चीनचे महत्त्वपूर्ण योगदान यामुळे झाली आहे.

ताज्या सरकारी आकडेवारीनुसार पाकिस्तानात गाढवांची संख्या वाढत आहे. या वाढीचं सर्वात मोठे कारण म्हणजे चीनबरोबरचा गाढवांचा व्यापार. चीन पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात गाढवांची खरेदी करतो आणि यामागचं मुख्य कारण म्हणजे गाढवांची कातडी.

गाढवाच्या कातडीचं चिनी कनेक्शन

चीनमध्ये गाढवांच्या कातडीचा वापर खास प्रकारचं पारंपारिक चिनी औषध '‘Ejiao' तयार करण्यासाठी केला जातो. हा जिलेटिनसारखा पदार्थ आहे, जो गाढवांच्या त्वचेपासून काढला जातो. अशक्तपणा दूर करण्यासाठी आणि त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठी चिनी औषधांमध्ये हा पदार्थ वापरला जातो.

पाकिस्तान चीनचा मुख्य पुरवठादार?

चीनमध्ये गाढवांची मागणी खूप जास्त आहे, पण त्यांची संख्या झपाट्यानं कमी होत आहे. अशा तऱ्हेने चीननं प्रमुख स्त्रोत म्हणून पाकिस्तानची निवड केली आहे. पाकिस्तानात गाढवांची संख्या वाढवण्यासाठी विशेष कार्यक्रम राबवले जात आहेत, जेणेकरून त्यांचा चीनला होणारा पुरवठा सुरळीत सुरू राहील. याशिवाय चीनमधील हवामान आणि हवामानातील आव्हानांमुळे तेथे गाढवांची संख्या तितकी नाही.

गाढवांचा व्यापारपाकिस्तानला गाढवांची कातडी चीनला विकून भरपूर परकीय चलन मिळत आहे. पण या व्यापाराची एक नकारात्मक बाजूही आहे. गाढवांची संख्या वाढवण्यासाठी त्यांची अंदाधुंद पैदास केली जात असून अनेक ठिकाणी त्यांच्यासोबत चुकीचं वर्तनही केलं जात आहे.

चीनमध्ये गाढवांना मागणी का आहे?

चीन जगातील अशा मोजक्या देशांपैकी एक आहे जिथे गाढवांची मागणी सातत्यानं वाढत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे गाढवांचं मांस, दूध आणि कातडीचा वापर. गाढवाचं मांस हे चीनमधील एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे, जे लोक मोठ्या प्रमाणात खातात. पाकिस्तान भविष्यात गाढवांवर आधारित आपला व्यवसाय कितपत पुढे नेतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सध्या पाकिस्तानात गाढवं केवळ ओझे उचलत नाहीत, तर देशाच्या अर्थव्यवस्थेला नवा आधार देत आहेत, असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळेच पाकिस्तानातील गाढवांचा व्यापार आणि त्याची संख्या अनेकदा चर्चेत असते.

टॅग्स :चीनपाकिस्तानव्यवसाय