Join us  

IRCTC च्या Shares नं गुंतवणूकदारांचे ३५००० कोटी बुडवले; अजूनही आहे का गुंतवणूकीची संधी?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 3:27 PM

IRCTC Share Price : गेल्या काही दिवसांपासून IRCTC च्या Shares मध्ये सुरु आहे मोठी घसरण.

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून IRCTC च्या Shares मध्ये सुरु आहे मोठी घसरण.

IRCTC Share Price : गेल्या काही दिवसांपासून IRCTC च्या शेअर्समध्ये घसरण सुरू आहे. सोमवारीही कामकाजादरम्यान IRCTC चे शेअर्स ११ टक्क्यांपेक्षा अधिक घसरल्याचं दिसून आलं. काही दिवसांपूर्वी या कंपनीचं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या वर गेलं होतं, तेच आता ६५ हजार कोटी रूपयांवर आलं आहे. याचाच अर्थ गुंतवणूकदारांना तब्बल ३५ हजार कोटी रूपयांचा फटका बसला आहे. IRCTC च्या शेअर सोमवारी तब्बल ११ टक्क्यांपेक्षा अधिक घसरून ४,०६४ रूपयांच्या जवळ ट्रेड करत होता. 

याच महिन्यात ११ ऑक्टोबर रोजी IRCTC च्या शेअर्सनं NSE वर  ६,३९६.३० रूपयांचा ऑल टाईम हायचा पल्ला गाठला होता. यानंतर कंपनीचा मार्केट शेअर लाख कोटींच्या वर गेलं होतं. परंतु त्यानंतर हा शेअर तब्बल २४०० रूपयांनी घसरला. ऑक्टोबर २०१९ मध्ये ही कंपनी शेअर बाजारावर लिस्ट झाली होती. त्यानंतर या शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न्स दिले होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून त्यात घसरण होताना दिसत आहे.

यापूर्वी या शेअरनं आतापर्यंतची उच्चांकी पातळी गाठल्यानंतर आजपर्यंत या शेअरमध्ये ३४ टक्क्यांपेक्षा अधिक घसरण दिसून आली. असं असलं तरी हा शेअर गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत १३९ टक्के वर आहे. NSE च्या F&O बॅन लिस्टमध्ये IRCTC ला सामिल करण्यात आलं आहे. दरम्यान ९५ टक्के मार्केट वाईड पोझिशन लिमिट क्रॉस केल्यामुळे (MWPL) फ्युचर ऑप्शनवर निर्बंध घालण्यात आल्याचं NSE नं सांगितलं. व्होडाफोन आइडिया, इंडियाबुल्स हाऊसिंग फायनँन्स, सन टीवी, भेल, नॅशनल एल्युमीनियम, एस्कॉर्ट्स आणि अमारा राजा बॅटरीज च्या शेअर्सना F&O च्या बॅन लिस्टमध्ये सामील करण्यात आलं आहे. यांना नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडून फ्यूचर्स अँड ऑप्शंस (एफअँडओ) वर बॅन केलं आहे. आयआरसीटीसीच्या शेअर्समध्ये अचानक घसरण झाल्याने गुंतवणूकदार अडचणीत सापडले आहेत."गेल्या एका महिन्यात आयआरसीटीसीच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली होती आणि प्रॉफिट बुकिंगची प्रतीक्षा होती. परंतु यात जास्त घसरण होण्याची शक्यता नाही. कारण याचा मोठ्या प्रमात हिस्सा भारत सरकारकडे आहे. परंतु याचा अर्थ असाही नाही की इतक्या घसरणीवर पैसे लावले पाहिजे," अशी प्रतिक्रिया Profitmart Securities चे संशोधन प्रमुख अविनाथ गोरक्षकर म्हणाले होते. पुढील काही सत्रांमध्ये बाजारात घसरण दिसून येईल. यामुळे IRCTC च्या शेअर्समध्ये अजूनही घसरण होऊ शकते. फिस्कल इयर २०२२ च्या सप्टेंबर तिमाहिचे निकाल येईपर्यंत IRCTC चे शेअर्स मर्यादित कक्षेत ट्रेंड करतील असंही त्यांनी नमूद केलं होतं.सप्टेंबरपासून तेजीIRCTC च्या शेअर्समध्ये सप्टेंबर महिन्यापासून तेजी पाहायला मिळाली होती. १ सप्टेंबर रोजी कंपनीच्या शेअरची किंमच २७३० रूपये होती. परंतु यानंतर सप्टेंबर अखेरपर्यंत हा शेअर ४ हजार रूपयांच्या जवळ पोहोचला. दरम्यान, ऑक्टोबर महिन्यातही शेअर्समध्ये तेजीचं सत्र सुरू होतं. दीर्घ कालावधीसाठी हा शेअर २ हजार रूपयांच्या टप्प्यात होता. परंतु कंपनीनं शेअर स्प्लिट करण्याची घोषणा केल्यानंतर या शेअर्सच्या किंमतीत तेजी दिसून आली. २८ ऑक्टोबर रोजी IRCTC च्या शेअर्स स्प्लिटची प्रक्रिया केली जाणार आहे. सध्या या शेअरची फेस व्हॅल्यू १० रूपये इतकी आहे. परंतु शेअर्स स्प्लिटनंतर या शेअरची फेस व्हॅल्यू २ रूपये होणार आहे. याशिवाय याचा ISIN क्रमांकदेखील बदलला जाणार आहे.

टॅग्स :आयआरसीटीसीशेअर बाजार