Join us
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या नोकऱ्या का जाताहेत? सव्वा कोटी महिलांनी गमावला रोजगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 06:23 IST

गेल्या वर्षात देशात सव्वा कोटी महिलांनी गमावला रोजगार

नवी दिल्ली : मागील ५ वर्षांत देशातील सव्वा कोटी महिलांना रोजगार गमवावा लागला आहे. चालू वर्षात जानेवारी ते एप्रिल या ४ महिन्यांच्या काळात २५ लाख महिलांचा रोजगार गेला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) या संस्थेने जारी केलेल्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

नोकरी जाण्याची कारणे काय?n प्रसूतीरजा १२ ऐवजी २६ आठवडे केल्याने महिलांना रोजगार देण्यास टाळाटाळn समाज अजूनही महिलांना बाहेर जाऊन काम करण्यास प्रोत्साहन देत नाही. n स्टार्टअप् कंपन्यांत पुरुषांना प्राधान्य दिले जातेn बाळंतपणानंतर बहुतांश महिला नोकरी सोडून देतात

कामकाजी महिलांच्या संख्येत घट होण्यामागे ३ प्रमुख कारणे आहेत. समाज अजूनही महिलांना बाहेर जाऊन काम करण्यास प्रोत्साहन देत नाही. स्टार्टअप कंपन्यांत पुरुषांना प्राधान्य दिले जाते आणि बाळंतपणानंतर बहुतांश महिला नोकरी सोडून देतात.    - मदन सबनीस, मुख्य अर्थशास्त्रज्ञ, बँक ऑफ बडोदा  

११.१ कोटी नोकऱ्या २०२२ च्या पहिल्या तिमाहीत जगभरात गेल्या 

१०० महिलांपैकी १२.३ महिलांना कोरोनाकाळात नोकरी गमवावी लागली. 

 

 

टॅग्स :नोकरीमहिला