Join us

८ महिन्यात प्रथमच घाऊक महागाई शून्यावर; नोव्हेंबरमध्ये उच्चांक, खाणेपिणे महागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 07:47 IST

नोव्हेंबरमध्ये घाऊक क्षेत्रातील महागाई वाढून ०.२६ टक्क्यांवर पोहोचली. हा महागाईचा आठ महिन्यांचा उच्चांक ठरला आहे.

नवी दिल्ली : नोव्हेंबरमध्ये घाऊक क्षेत्रातील महागाई वाढून ०.२६ टक्क्यांवर पोहोचली. हा महागाईचा आठ महिन्यांचा उच्चांक ठरला आहे. खाद्यपदार्थ, विशेषतः कांदे आणि भाजीपाल्यांच्या किमतीत मोठी वाढ झाल्यामुळे महागाईचा दर वर चढला आहे. घाऊक किंमत निर्देशांकावर (डब्ल्यूपीआय) आधारित महागाई एप्रिलपासून सतत शून्याच्या खाली राहिली आहे. ऑक्टोबरमध्ये ती उणे ०.५२ टक्के होती.

केंद्राने ही आकडेवारी जाहीर केली आहे. नोव्हेंबर मध्ये मुख्यत्वे खाद्यवस्तू, खनिजे, यंत्रसामग्री व उपकरणे, संगणक, इलेक्ट्रॉनिक व ऑप्टिकल उत्पादने, मोटार वाहने, इतर वाहतूक उपकरणे इत्यादींच्या किमती वाढल्या. त्यामुळे महागाई सकारात्मक टप्प्यात राहिली.

घाऊक महागाई

एप्रिल-  ०.९२ टक्के

मे- ३.४८ टक्के

जून- ४.१२ टक्के

जुलै- १.३६ टक्के

ऑगस्ट- ०.५२ टक्के

सप्टेंबर- ०.२६ टक्के

ऑक्टाेबर- ०.५२ टक्के

नाेव्हेंबर- ०.२६ टक्के

नोव्हेंबरमध्ये खाद्यपदार्थांची महागाई राहिली.

महागाई ऑक्टोबरमध्ये होती.