Join us

करोडपती बनण्यास तुम्हाला कोणी रोखले? नेमके काय करावे लागेल? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 08:32 IST

आयुष्यात टाटा बिर्ला नाही तर किमान करोडपती व्हावे, असे बहुतांशी मध्यमवर्गीयांना वाटत असते.

लोकमत न्यूज नेटवर्क : आयुष्यात टाटा बिर्ला नाही तर किमान करोडपती व्हावे, असे बहुतांशी मध्यमवर्गीयांना वाटत असते. यात गैर काहीही नाही. आर्थिक नियोजनाचा योग्य विचार आणि त्यानुसार कृती केल्यास आयुष्यात करोडपती बनायला कोणीही रोखू शकणार नाही.

करोडपती बनायचे आहे तर...

- बचतीची सवय आणि त्यात सातत्य कायम ठेवा

- नोकरी लागल्यावर पगारातून किमान २० टक्के रक्कम भविष्यासाठी तरतूद म्हणून बचत करा.

- जितकी रक्कम बचतीसाठी बाजूला काढाल  तिचे  विभाजन खालीलप्रमाणे करा.

- जसे वय वाढेल तसतसे बचतीचे प्रमाण बदलत राहा. आधीची बचत काढून खर्च करू नका. पुन्हा बचतीतच फिरवा. 

- जितके वय कमी तितकी गुंतवणूक थेट शेअर बाजारात आणि म्युच्युअल फंड्समध्ये जास्त करावी. दीर्घ काळात याचा परतावा उत्तम मिळू शकतो. 

- जास्त वयात आपली रिस्क कॅपॅसिटी कमी होते म्हणून सुरक्षित अशा रिकरिंग / पोस्ट अल्पबचत योजनेत रक्कम अधिक गुंतवावी. 

- कमी वयात गुंतवणूक सुरू केल्यास बचतीसाठी अनेक वर्षे आपल्या हाती असतात. बचतीत सातत्य ठेवा आणि रिटायरमेंटपर्यंत सुरू ठेवा.

महिना ५ हजार रुपये  बाजूला काढून किमान ३० वर्षे न चुकता इक्विटी, म्युच्युअल फंड्स, पेन्शन योजना आणि अल्पबचत योजनेत रक्कम गुंतविल्यास आपल्याला करोडपती बनण्यास कोणीही रोखू शकत नाही. यासाठी आपल्या विश्वासू आर्थिक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्या.

वय    इक्विटी    म्युच्युअल     पेन्शन    व्हीपीएफ/    (शेअर्स)    फंड्स    योजना    अल्पबचत २५ ते ३०    ३०%     २०%    २०%    ३०%             ३० ते ३५    २५%    २०%    २५%    ३०%             ३५ ते ४०    २५%    २०%    २५%    ३०%               ४० ते ४५    २०%    १५%    ३५%    ३०%               ४५ ते ५०    २०%    १०%    ३५%    ३५%               ५० व पुढे    १५%    १०%    ३५%    ४०%  

व्हीपीएफ : व्हॉलंटरी प्रॉव्हिडंट फंड. यात कर्मचारी स्वतःचा १२% हिस्सा वाढवू शकतात. याचाही विचार अवश्य करावा. (वरील तक्त्यात मेडिकलेम / ॲक्सिडंट इंश्युरन्स समाविष्ट नाही.)

टॅग्स :गुंतवणूक