China Rare Earth: चीननं परदेशी गुप्तचर संस्थांवर मोठा आरोप केला आहे. कंट्रोल्ड रेअर अर्थ मेटल चोरी होत असल्याचा आरोप चीनच्या गुप्तचर संस्थेनं केला आहे. आपण तस्करी रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचं चीननं म्हटलंय. अमेरिकेसोबतच्या टॅरिफ चर्चेत चीन यांचा वापर सौदेबाजीचं साधन म्हणून करतो.
या वस्तूंच्या तस्करीतमध्येकोणत्याही देशाचं नाव अद्याप चीननं घेतलेलं नाही. चीनच्या राज्य सुरक्षा मंत्रालयाने परदेशी संस्थांवर या वस्तूंची तस्करी केल्याचा आरोप केलाय. चीनच्या दृष्टिकोनातून वस्तू खूप महत्त्वाच्या आहेत. चीननं अमेरिकेसोबत महत्त्वाच्या इंडस्ट्रीयल रिसोर्सेसच्या निर्यातीसाठी आवश्यक बाबींवर पुनर्विचार करण्यास तयार झाला आहे.
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
मंत्रालयानं काय म्हटलं?
मंत्रालयाने शुक्रवारी WeChat वर एक पोस्ट केली. "गेल्या काही वर्षांत, परदेशी हेर आणि गुप्तचर संस्थांनी देशात बेकायदेशीर मार्गांनी रेअर अर्थ मेटलची चोरी केली आहे आणि लोकांना भडकवण्याचा प्रयत्नही केला आहे. यामुळे आपल्या राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे," असं यात नमूद करण्यात आलं होतं.
रेअर अर्थ मेटल का महत्त्वाचं?
अमेरिकेसोबत सुरू असलेल्या व्यापार युद्धात स्वतःचा बचाव करण्यासाठी चीन या मेटलचा आणि रेअर अर्थ मेटलचा वापर करतो. हे सर्व मेटल इलेक्ट्रिक वाहनं इत्यादींच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे चीनवरील अवलंबित्व वाढतं. बीजिंगने आपले निर्यात नियम कडक केले आहेत. ज्यामुळे फोर्डला त्यांच्या एका प्लांटमधील उत्पादन कमी करावं लागलं. या निर्बंधांमुळे चीन आणि युरोपियन युनियनमधील तणाव वाढला आहे.