Join us
Daily Top 2Weekly Top 5

देशात सर्वाेत्कृष्ट कंपनी कोणती? जगातील बेस्ट कंपन्यांची फाेर्ब्सची यादी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 07:30 IST

कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने भारतातील सर्वात चांगली कंपनी काेणती, असा प्रश्न बऱ्याचदा पडताे.

नवी दिल्ली :

कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने भारतातील सर्वात चांगली कंपनी काेणती, असा प्रश्न बऱ्याचदा पडताे. फाेर्ब्सच्या यादीनुसार रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी भारतात अग्रस्थानी ठरली आहे. तर जागतिक क्रमवारीत रिलायन्स इंडस्ट्रीज विसाव्या स्थानी आहे. महसूल, नफा आणि बाजारमूल्य या आधारे ही यादी तयार करण्यात आली आहे. दक्षिण काेरियाची सॅमसंग ही कंपनी जगातील सर्वाेत्कृष्ट कंपनी ठरली आहे. 

- फाेर्ब्सने नुकतीच ‘वर्ल्ड बेस्ट एम्प्लाॅयर्स २०२२’ची क्रमवारी जाहीर केली आहे. - त्यात क्रमांक २ ते १२ पर्यंत अमेरिकन कंपन्यांचाच दबदबा आहे. - त्यानंतर तेराव्या स्थानी जर्मन ऑटाेमेकर बीएमडब्ल्यू ही कंपनी आहे. 

1. रिलायन्समध्ये सुमारे २.३० लाख कर्मचारी काम करतात. टाॅप १०० मध्ये या एकमेव कंपनीला स्थान मिळाले आहे. 2. रिलायन्सने जर्मनीच्या मर्सिडीज बेंझ, अमेरिकेची काेका-काेला, जपानच्या हाेंडा आणि यामाहा तसेच साैदीच्या अरामकाे या कंपन्यांना मागे टाकले आहे.

जगातील टॉप ५१. सॅमसंग - दक्षिण काेरिया२. मायक्राेसाॅफ्ट - अमेरिका३. आयबीएम - अमेरिका४. अल्फाबेट - अमेरिका५. ॲपल - अमेरिका

- यादीत एकूण ८०० कंपन्यांना समाविष्ट करण्यात आले आहे. ५७ देशांमधील विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील सुमारे १.५ लाख कर्मचाऱ्यांचे मत जाणून घेतले.

यादीतील इतर भारतीय कंपन्या

  • एचडीएफसी बँक -    १३७
  • बजाज -    १७३
  • आदित्य बिर्ला समूह -    २४०
  • हिराे माेटाेकाॅर्प -    ३३३
  • लार्सन ॲण्ड टुब्राे -    ३५४
  • आयसीआयसीआय बँक -    ३६५
  • एचसीएल टेक्नाॅलाॅजी -    ४५५
  • स्टेट बँक ऑफ इंडिया -    ४९९
  • अदानी एंटरप्रायझेस -    ५४७
  • इन्फाेसिस -    ६६८या मुद्द्यांवर रेटिंगकंपनीची प्रतिमा, इकाॅनाॅमिक फुटप्रिंट, टॅलेंट डेव्हलपमेंट, स्त्री-पुरुष समानता आणि सामाजिक जबाबदारी इत्यादी मुद्दे विचारात घेऊन रेटिंग देण्यात आले आहे.
टॅग्स :फोर्ब्स