Join us

भारतात सर्वाधिक वेतन कोणत्या उद्योगपतीला? अदानींची सॅलरी त्यांच्या कर्मचाऱ्यापेक्षा कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 08:45 IST

देशातील इतर उद्योगपतींच्या तुलनेत अदानी यांचे वेतन कमी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : अदानी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांना त्यांच्या विविध कंपन्यांकडून २०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण ९.२६ कोटी रुपयांचे वेतन मिळाले आहे. देशातील इतर उद्योगपतींच्या तुलनेत अदानी यांचे वेतन कमी आहे. अदानी एनर्जी लिमिटेड या कंपनीच्या बोर्डातील महत्त्वाचे कार्यकारी अधिकारी आणि संचालक असलेले विनय प्रकाश यांनाही गौतम अदानी यांच्यापेक्षा जादा वेतन देण्यात आले आहे. त्यांना वर्षभरात ८९.३७ कोटी इतके वेतन दिले आहे.

  • पवन मुंजाळ (हीरो मोटोकॉर्प) ८० कोटी 
  • राजीव बजाज (बजाज कॅपिटल) ५३.७ कोटी 
  • सुनील मित्तल (भारती एन्टरप्रा) १६.७ कोटी 
  • गौतम अदानी (अदानी ग्रुप) ९.२६ कोटी
टॅग्स :गौतम अदानी