Join us

करबचतीसाठी काेणता फंड ठरेल फायदेशीर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 06:35 IST

एकूण परताव्याच्या दृष्टीने पीएमएस फंड अधिक फायदेशीर ठरताे.

करबचतीसाठी गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत. म्युच्युअल फंड हा त्यांपैकीच एक. त्याच प्रकारचा आणखी एक पर्याय आहे ताे म्हणजे, पाेर्टफाेलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस (पीएमएस) फंड. हा कस्टमाइज्ड पाेर्टफाेलिओ आहे. त्यात बडे गुंतवणूकदारच गुंतवणूक करतात; किमान गुंतवणुकीची रक्कम ५० लाख रुपये आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते करबचतीसाठी म्युच्युअल फंड जास्त फायदेशीर आहे. मात्र, एकूण परताव्याच्या दृष्टीने पीएमएस फंड अधिक फायदेशीर ठरताे.

दाेन्ही फंडांमध्ये फरक काय?nम्युच्युअल फंडामध्ये ५०० रुपयांपासून गुंतवणूक करता येते; तर पीएमएसमध्ये किमान रक्कम ५० लाख रुपये आहे.nसेबीचे म्युच्युअल फंडावर नियंत्रण आहे. शुल्काची रक्कम सेबी ठरविते; तर पीएमएसबाबत ठाेस मापदंड नाहीत. nशेअर बाजारात सहज खरेदी किंवा विक्री करता येत नाही, अशा शेअर्समध्ये पीएमएसची गुंतवणूक हाेते; तर म्युच्युअल फंडाबाबत तसे नाही.

लाभांशाच्या बाबतीत काेण पुढे?पीएमएस : लाभांश गुंतवणूकदारांच्या उत्पन्नात जाेडून टप्प्यानुसार कर आकारला जाताे. 

५००० रुपयांपेक्षा जास्त लाभांश असल्यास १०% टीडीएस लागताे.

म्युच्युअल फंड : लाभांश एनएव्हीशी जाेडलेला असताे. एका वर्षापेक्षा जास्त काळ गुंतवणूक ठेवल्यास १० % कॅपिटल गेन कर लागताे.

      कर आकारणीतील फरक (आकडे रुपयांमध्ये)           विवरण    पीएमएस    म्युच्युअल फंडगुंतवणुकीची रक्कम    ५० लाख    ५० लाखअंदाजित परतावा १० टक्के    ५५ लाख    ५५ लाखशुल्क २ टक्के    १.१० लाख    १.१० लाखएकूण मूल्य    ५५ लाख    ५३.९० लाखकरपात्र रक्कम    ५ लाख    ३.९० लाखकर    ७५,०००    ५८,५००

टॅग्स :इन्कम टॅक्सव्यवसाय