Join us

काेणते शहर आहे सर्वात महागडे?; महाराष्ट्रातील २ शहरांचा यादीत समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 06:40 IST

२२६ शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले. घर, वाहतूक, खाणेपिणे, कपडे, मनाेरंजा यासह २०० घटकांवरून महागाईचे निकष ठरविण्यात आले.

नवी दिल्ली - महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. देशातील सर्वात महाग शहर काेणते, असा प्रश्न काेणी केला तर त्याचे उत्तर आहे मुंबई. तर, हाॅंगकाॅंग हे जगातील सर्वात महागडे शहर आहे.

मायानगरी मुंबईसह पुणे आणि दिल्ली या शहरांचाही या यादीत समावेश आहे. ‘मर्सर’ या संस्थेने जगातील राहण्यासाठी सर्वात महागड्या शहरांचे सर्वेक्षण केले. त्यानुसार मुंबई हे भारतातील सर्वात महागडे शहर ठरले आहे. त्याखालाेखाल देशाची राजधानी दिल्लीचा क्रमांक येताे.

ही आहेत भारतातील सर्वात महागडी शहरे

शहर    जागतिक क्रमवारीमुंबई    १३६दिल्ली    १६५चेन्नई    १८९बंगळुरू    १९५हैदराबाद    २०२पुणे    २०५काेलकाता    २०७

१३६  व्या स्थानी मुंबई जागतिक क्रमवारीत आहे. १६५  व्या स्थानी दिल्ली या क्रमवारीत आहे. २२६ शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले. घर, वाहतूक, खाणेपिणे, कपडे, मनाेरंजा यासह २०० घटकांवरून महागाईचे निकष ठरविण्यात आले.

ही शहरे सर्वात स्वस्तइस्लामाबाद, लागाेस, अबुजा ही शहरे चलनी मुल्यात घसरण झाल्यामुळे सर्वात स्वस्त आहेत.

जगातील सर्वात महाग शहरे (टाॅप ५)

हाॅंगकाॅंग सिंगापूर झ्युरिक जिनेव्हाबेसल