Join us

गुड न्यूज! लवकरच पीठ आणि गहू होणार स्वस्त, सरकारने तयार केली खास योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 17:06 IST

Wheat Price : सध्या गव्हाच्या दरात वाढ झाली आहे, त्यामुळे पिठाचे भावही वाढले आहेत. आता वाढत्या किमतींवर नियंत्रण आणण्यासाठी सरकार लवकरच मोठी कारवाई करू शकते.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत महागाईत वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. देशात खाद्यपदार्थांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. सध्या गव्हाच्या दरात (Wheat Price) सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या किमती रोखण्यासाठी सरकारने मे महिन्यात गव्हाच्या निर्यातीवरही बंदी घातली होती. सध्या गव्हाच्या दरात वाढ झाली आहे, त्यामुळे पिठाचे भावही वाढले आहेत. आता वाढत्या किमतींवर नियंत्रण आणण्यासाठी सरकार लवकरच मोठी कारवाई करू शकते.

गव्हाच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी केंद्र सरकार साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करू शकते. खाद्य सचिव सुधांशू पांडे यांनी सांगितले की, जर भारतात गव्हाचा पुरेसा साठा असेल तर सर्वसामान्यांना काळजी करण्याची गरज नाही. गव्हाच्या किरकोळ किमतीत वाढ सट्टा व्यवसायामुळे झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने साठेबाजी करणाऱ्यांना इशारा दिला असून त्यांच्यावर लवकरच कारवाई होऊ शकते, असेही सुधांशू पांडे  म्हणाले.

गेल्या वर्षीपासून आतापर्यंत गव्हाच्या किरकोळ किमतीत 19 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी गव्हाचे दर 26.01 रुपये किलो होते, ते आज  31.02  रुपये किलो झाले आहेत. याशिवाय, पिठाच्या किमतींवर नजर टाकली तर गेल्या वर्षी पिठाचा भाव 30.53 रुपये किलो होता. त्याच वेळी, आज पिठाचा भाव 36.1 रुपये प्रति किलो आहे. या दरम्यान पिठाच्या किमतीत 18 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

उत्पादन किती होत आहे?जर गव्हाच्या उत्पादनाबद्दल बोलायचे झाल्यास, गहू 2021-22 पीक वर्षाच्या (जुलै-जून) रब्बी हंगामात जवळपास 105 मिलियन (10.5 कोटी टन) टन होते. त्याचबरोबर व्यापाऱ्यांच्या अंदाजाबाबत बोलायचे झाले तर गव्हाचे उत्पादन 9.5 कोटी टन होईल. दरम्यान, सरकारने 13 मे रोजी गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती.

टॅग्स :व्यवसाय