Join us  

WhatsApp च्या ४ कोटी युजर्सला मोठा दिलासा; NPCI नं दिला महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 7:42 PM

व्हॉट्सअप भारतातील अनेक मोठ्या कंपन्यांना टक्कर देण्याची तयारी करत आहे. त्यात गुगल पे, सॉफ्ट बँक, पेटीएम, फोन पे सारख्या सर्व्हिसचा समावेश आहे.

Whatsapp युजर्ससाठी आनंदाची बातमी आली आहे. आता पेमेंट सर्व्हिससाठी यूजरची संख्या दुप्पट करण्याची परवानगी व्हॉट्सअपला मिळाली आहे. नॅशनल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने यासाठी मान्यता दिली आहे. आता व्हॉट्सअप भारतात त्यांच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यामातून ४ कोटी युजर्सला पेमेंटची सर्व्हिस वापरण्याची सुविधा देऊ शकतो. सुरुवातीला ही संख्या २ कोटी इतकी होती. रॉयटर्सने याबाबत माहिती दिली आहे.

व्हॉट्सअपने NPCI कडे परवानगी मागत पेमेंट सर्व्हिस देण्यासाठी युजर्स मर्यादित संख्येत वाढ करण्याची परवानगी मागितली होती. परंतु NPCI नं व्हॉट्सअपला त्यांच्या मर्जीप्रमाणे युजर्सची संख्या वाढवण्याची परवानगी दिली नाही परंतु या आधीच्या संख्येत दुप्पट करण्याला मान्यता दिली आहे. आतापर्यंत व्हॉट्सअपला भारतात २ कोटी युजर्स बनवण्याची परवानगी होती. आता ही संख्या दुप्पट म्हणजे ४ कोटी इतकी करण्यात आली आहे. व्हॉट्सअप ही फेसबुकच्या मालकीची कंपनी आहे. ज्याचं अलीकडेच मेटा नाव ठेवण्यात आले.

भारतात व्हॉट्सअपचे ५० कोटी यूजर्स

सूत्रांनी रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार, ४ कोटी युजर्सला पेमेंट सर्व्हिस देण्याची परवानगी व्हॉट्सअपसाठी मोठी नाही कारण कंपनीचे भारतात ५० कोटी युजर्स आहेत. ज्यांच्यापर्यंत कंपनीला ही सुविधा पोहचवायची आहे. सध्या त्या ५० कोटींपैकी केवळ ४ कोटी ग्राहकांनाच व्हॉट्सअपच्या पेमेंट सर्व्हिसचा वापर करता येऊ शकतो. NPCI ने व्हॉट्सअपला परवानगी दिली परंतु हा नवीन नियम कधीपासून लागू करावा याबाबत स्पष्ट केले नाही.

व्हॉट्सअप भारतातील अनेक मोठ्या कंपन्यांना टक्कर देण्याची तयारी करत आहे. त्यात गुगल पे, सॉफ्ट बँक, पेटीएम, फोन पे सारख्या सर्व्हिसचा समावेश आहे. भारतात सध्या डिजिटल पेमेंट मार्केटमध्ये या ४ कंपन्यांचा बोलबाला आहे. परंतु व्हॉट्सअपकडे ५० कोटी युजर्स असूनही गुगल पे, पेटीएम आणि फोन पेच्या तुलनेत ते कमी प्रसिद्ध झालं आहे. त्यामुळे अजूनही व्हॉट्सअपला काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.

भारतात हळूहळू कॅश पेमेंट कमी होऊ लागली आहेत. तर डिजिटल पेमेंटकडे सर्वांचा कल दिसून येत आहे. डेबिट, क्रेडिट कार्ड पेमेंटही वाढले आहे. परंतु ई वॉलेट पेमेंट सहज आणि जलद गतीने होत असल्याने सर्वांवर ते भारी पडत आहे. मोबाईलमध्ये स्कॅनरच्या सहाय्याने काही सेकंदात पेमेंट होऊन जाते. त्यामुळे लोकांना रोख रक्कम सोबत ठेवण्याची गरज आता भासत नाही.

टॅग्स :व्हॉट्सअ‍ॅप