नवी दिल्ली - नव्या आयकर फॉर्ममध्ये आता एचआरए क्लेम करणे पहिल्यासारखे सोपे राहिले नाही. भाडे कर सवलत घेणाऱ्यांना घर मालकाशी काय नाते आहे हे आता जाहीर करावे लागणार आहे. नवीन आयकर अधिनियम २०२५ अंतर्गत नियम आणि फॉर्ममध्ये मोठे बदल प्रस्तावित करण्यात आले आहे. येत्या १ एप्रिल २०२६ पासून नवीन कायदा लागू होणार आहे.
सरकारने करदात्यांसाठी नवीन ड्राफ्ट नियम आणि फॉर्म जारी केले आहेत. याआधारे अंतिम नियम आणि फॉर्म पुढील महिन्यात अधिसूचित करण्यात येतील. त्यात सर्वात महत्त्वाचा बदल नवीन फॉर्म १२४ मध्ये केला आहे. या अंतर्गत कुठल्याही कर्मचाऱ्याला HRA(HRA Claim Rules 2026) दावा करायचा असेल तर त्याला ज्या घरमालकाला तो भाडे देत आहे त्याच्याशी त्याचे कौटुंबिक अथवा नातेसंबंध काय हे स्पष्ट करावे लागणार आहे. सध्याच्या व्यवस्थेनुसार कर्मचारी आपल्याला कंपनीला घरभाड्याची माहिती देतात परंतु घरमालक हा त्यांचा नातेवाईक आहे की नाही हे सांगावे लागत नाही.
नवीन फॉर्म १२४ नुसार भाडे दिलं जाते त्याच्याशी कौटुंबिक किंवा इतर संबंध आहेत का हे स्पष्ट करावे लागेल. कर वाचवण्यासाठी करदाते आपल्या आई वडिलांच्या नावे भाड्याच्या पावत्या सादर करतात. परंतु नव्या नियमांमुळे खोट्या भाडेपावत्यांना चाप बसणार आहे. त्याशिवाय व्यवहार खरा असला तरी नातेसंबंध उघड केल्याने पडताळणी करणे अधिक सोपे होईल. सरकारने HRA दाव्यांमधील पारदर्शकता वाढवण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. घर मालक आणि भाडेकरू यांच्यातील संबंधांचा खुलासा करणे बंधनकारक केल्याने खोटे आणि अधिक वाढवून दाखवलेल्या दाव्यांवर अंकुश लागेल असं कर तज्त्रांनी म्हटलं आहे.
कोणती माहिती द्यावी लागेल?
HRA चा दावा करताना पगारदार करदात्यांनी घरमालकाबद्दल माहिती द्यावी लागेल. ज्यात नाव, पत्ता, पॅन आणि घरमालकाशी असलेले नाते सांगावे लागेल. नातेवाईकांना दिलेल्या भाड्यासाठी HRA दावे खरे आणि सत्यापित आहेत याची खात्री करण्यासाठी हे केले आहे. नवीन नियमात कुटुंबातील सदस्यांना भाडे देण्यास मनाई करण्यात आली नाही. तुम्ही HRA सूट मागू शकता पण त्यासाठी वैध भाडे करार आवश्यक आहे आणि भाडे रोख रकमेऐवजी बँक हस्तांतरणाद्वारे भरावे लागेल. घरमालकाने तुमच्या आयकर रिटर्नमध्ये भाड्याचे उत्पन्न उघड केले पाहिजे.
Web Summary : New income tax rules from April 2026 require HRA claimants to disclose their relationship with the landlord. This aims to curb false rent receipts and increase transparency in HRA claims. Details like name, address, PAN, and relationship must be provided.
Web Summary : अप्रैल 2026 से नए आयकर नियमों के अनुसार, एचआरए दावा करने वालों को मकान मालिक के साथ अपना संबंध बताना होगा। इसका उद्देश्य झूठी किराया रसीदों पर अंकुश लगाना और एचआरए दावों में पारदर्शिता बढ़ाना है। नाम, पता, पैन और संबंध जैसे विवरण प्रदान करने होंगे।