Join us
Daily Top 2Weekly Top 5

काय आहे आधार कार्डाचं लॉक, अनलॉक फीचर; पाहा कसं आणि केव्हा करू शकता याचा वापर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 12:26 IST

Aadhaar Lock-Unlock Feature: आधार हे एक महत्त्वाचं दस्तऐवज आहे. अनेक महत्त्वाच्या कामांसाठी आधारचा वापर केला जातो. आधारमध्ये अनेक प्रकारची वैयक्तिक माहिती असल्यानं त्याची सुरक्षाही तितकीच महत्त्वाची ठरते.

Aadhaar Lock-Unlock Feature: आधार हे एक महत्त्वाचं दस्तऐवज आहे. अनेक महत्त्वाच्या कामांसाठी आधारचा वापर केला जातो. आधारमध्ये अनेक प्रकारची वैयक्तिक माहिती असल्यानं त्याची सुरक्षाही तितकीच महत्त्वाची ठरते. यासाठी आधार एक उपयुक्त सुविधा देते ज्याला "आधार लॉक/अनलॉक" असं म्हटलं जातं. ही सुविधा तुम्हाला तुमच्या आधार नंबरच्या वापरावर पूर्ण नियंत्रण देते. वैयक्तिक डेटाची सुरक्षा आणि गोपनीयता सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

हेच लक्षात घेऊन UIDAI ने आधार नंबर लॉक आणि अनलॉक करण्याची सुविधा दिली आहे. जेव्हा आधार लॉक केलं जातं, तेव्हा काही सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद होतात.

आधार लॉक केल्यावर काय होतं?

आधार लॉक केल्यावर तुमच्या आधार नंबरद्वारे कोणत्याही प्रकारचे ऑथेंटिकेशन (बायोमेट्रिक, डेमोग्राफिक किंवा OTP) होऊ शकत नाही.कोणतीही संस्था तुमचा आधार नंबर वापरून तुमची ओळख ऑथेंटिकेट करू शकत नाही.मात्र, तुम्ही व्हर्च्युअल आयडी (VID) वापरू शकता. ही १६ अंकी तात्पुरती संख्या असते, जी आधारशी जोडलेली असते.

आधार लॉक करण्याचे मार्गतुम्ही दोन प्रकारे तुमचे आधार लॉक करू शकता:१. UIDAI च्या वेबसाईटच्या माध्यमातून

  • UIDAI वेबसाईटला भेट द्या: https://uidai.gov.in/
  • “My Aadhaar” सेक्शनमध्ये जाऊन “Aadhaar Lock & Unlock” वर क्लिक करा.
  • “UID Lock” निवडा आणि तुमचा आधार नंबर, पूर्ण नाव आणि पिन कोड एन्टर करा.
  • OTP (SMS द्वारे) किंवा mAadhaar ॲपवरून TOTP निवडा.
  • OTP/TOTP टाकून सबमिट करा.

आधार लॉक झाल्यावर तुम्हाला एक मेसेज मिळेल.

२. mAadhaar ॲपच्या माध्यमातून

  • Google Play Store किंवा Apple App Store वरून mAadhaar ॲप डाउनलोड करा.
  • नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि OTP ने लॉग इन करा.
  • “Services” सेक्शनमध्ये जाऊन “Aadhaar Lock/Unlock” निवडा.
  • “Lock Aadhaar” वर क्लिक करा आणि सूचनांचे पालन करा.
  • सत्यापनासाठी आधार नंबर आणि OTP एन्टर करावा लागेल.

आधार अनलॉक कसं कराल?

  • आधार अनलॉक करण्यासाठी तुमच्याकडे नवीन १६ अंकी VID असणं आवश्यक आहे.
  • जर तुम्ही VID विसरला असाल, तर SMS सेवेद्वारे नवीन VID प्राप्त करू शकता.
  • UIDAI वेबसाईटवर जा.
  • “Unlock” पर्याय निवडा.
  • नवीन VID आणि सिक्युरिटी कोड एन्टर करा.
  • OTP किंवा TOTP निवडून सबमिट करा.
  • तुमचं आधार यशस्वीरित्या अनलॉक होईल.
English
हिंदी सारांश
Web Title : Aadhaar Lock/Unlock: Secure your Aadhaar; Steps and benefits explained.

Web Summary : Locking Aadhaar secures personal data by disabling authentication. Unlock requires a VID. Use UIDAI portal or mAadhaar app to lock/unlock easily.
टॅग्स :आधार कार्डसरकार