Join us

काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 12:04 IST

Flat Purchase Loading Factor: जर तुम्ही कधी फ्लॅट खरेदी करण्याचा विचार केला असेल तर तुम्ही अनेकदा एक शब्द ऐकला असेल - सुपर बिल्ट-अप एरिया. पण नक्की काय आहे हा प्रकार जाणून घेऊ.

Flat Purchase Loading Factor: जर तुम्ही कधी फ्लॅट खरेदी करण्याचा विचार केला असेल तर तुम्ही अनेकदा एक शब्द ऐकला असेल - सुपर बिल्ट-अप एरिया. जेव्हा तुम्ही घरात शिफ्ट होता तेव्हा समजतं की जो फ्लॅट १२०० स्क्वेअर फूट असल्याचं म्हटलं जात होतं, खरं तर त्यात लिव्हिंग स्पेस फक्त ८००-८५० स्क्वेअर फूट आहे. रिअल इस्टेटचा हा सर्वात मोठा भ्रम आहे आणि तो म्हणजे लोडिंग फॅक्टर.

हा एक असा शब्द आहे जो घर घेताना आपल्याला समजावून सांगितला जात नाही, कारण याच्या आधारे आपल्याला कमी क्षेत्रफळाचा फ्लॅट जास्त किंमतीत विकतात. सर्वसामान्यांना अनेकदा या तांत्रिक शब्दाची माहिती नसते आणि त्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान होतं.

डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?

लोडिंग फॅक्टर म्हणजे काय?

लोडिंग फॅक्टर हा तो भाग आहे जो फ्लॅटच्या सुपर बिल्ट-अप एरियामध्ये जोडला जातो, परंतु जो आपण खासगीरित्या वापरू शकत नाही. यामध्ये लिफ्ट आणि लॉबी, पायऱ्या, कॉरिडोअर, क्लब हाऊस, जिम, स्विमिंग पुल, गार्डनर, कम्युनिटी हॉल, कधी कधी पार्किंग एरियाचाही समावेश केला जातो.

जर आपल्या फ्लॅटचा कार्पेट एरिया ८०० स्क्वेअर फूट असेल आणि लोडिंग फॅक्टर ३०% असेल तर तुमचा सुपर बिल्ट-अप एरिया = ८००+ (८०० x ३०%) = १०४० स्क्वेअर फूट असेल. आता बिल्डर प्रति चौरस फूट ८,००० रुपये दर आकारत असल्याने तो १०४० × ८००० रुपये = ८३.२ लाख रुपये आकारणार आहे, तर प्रत्यक्षात आपण फक्त ८०० चौरस फुटांचे घर विकत घेत आहात.

का लपवली जाते ही माहिती?

  • सुपर बिल्ट-अप एरिया मोठा दिसत असल्यानं ग्राहकाला फ्लॅट मोठा वाटतो.
  • विकासकाला अधिक चौरस फूट दाखवून प्रति युनिट किंमत कमी ठेवण्याची संधी मिळते.
  • उदाहरणार्थ, रु. ८०००/चौरस फूट ऐवजी ६८०० रुपये प्रति चौरस फूट हा सौदा अधिक परवडणारा वाटतो.
  • बरेच ग्राहक फक्त एकूण क्षेत्रफळ पाहून निर्णय घेतात आणि लोडिंग फॅक्टर्सच्या जाळ्यात अडकतात. 

RERA चं म्हणणं काय?

रेरानं (Real Estate Regulatory Authority) सर्व रिअल इस्टेट कंपन्यांना त्यांच्या सर्व प्रकल्पांमध्ये कार्पेट एरियावर आधारित किंमती दाखवणं बंधनकारक केलं आहे. परंतु प्रत्यक्षात आजही अनेक विकासक ग्राहकांना सुपर बिल्ट-अप एरियावर आधारित दर देतात आणि लोडिंग फॅक्टरबद्दल बोलणं ते टाळतात.

टॅग्स :व्यवसायगुंतवणूक