३० एप्रिल रोजी इनकम टॅक्स विभागाने आयटीआर फॉर्म जारी केले आहेत. लवकरच सर्व कंपन्याही कर्मचाऱ्यांना फॉर्म-१६ देण्यास सुरुवात करतील. या फॉर्ममध्ये वार्षिक उत्पन्न, टॅक्स डिडक्शन यासारख्या सर्व माहितीचा समावेश असतो. आयटीआर फाईल करताना करदाते रिफंडसाठीही विनंती करतात.
पण कधी कधी हा रिफंड अडकतो. सामान्यपणे आयटीआर फाईल केल्यानंतर २ ते ४ आठवड्यांत रिफंड मिळतो. फाईलिंगवेळी ई-व्हेरिफाय करण्यास विसरला असल्यास रिफंडमध्ये अडचणी येऊ शकतात. पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक नसल्यासही रिफंड अडकू शकतो.
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
याशिवाय टीडीएसचा मेळ न बसल्यासही तुमचा रिफंड अडकतो. आयटीआर फाईल करताना बँक खाते क्रमांक चुकीचा दिला असेल, तरीही तुमच्या रिफंडचे पैसे अडकतात.
तुम्ही घरी बसूनच हे पाहू शकता की, तुमचा रिफंड कधीपर्यंत येणार आहे. यासाठी सर्वप्रथम इनकम टॅक्सच्या अधिकृत वेबसाइटवर जा. लॉगिन डिटेल्स टाकून लॉगिन करा. इथे तुम्हाला “टॅक्स रिटर्न फॉर्म्स” हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला असेसमेंट इयर निवडावा लागेल. मग आलेल्या एक्नॉलेजमेंट नंबर या पर्यावर क्लिक करताच तुम्हाला रिफंड दिसेल. सोबतच इनकम टॅक्स विभाग रिफंडची माहिती करदात्याला ईमेल आणि मेसेजवर देतो. जर रिफंड प्रोसेसमध्ये काही अडचण असेल, तर त्याचीही माहिती ईमेलवर मिळते.