Join us

मंदीच्या सावटात शेअर बाजाराचे काय?; गुंतवणूकदारांची गळती थांबेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 05:59 IST

शेअर बाजारातील पहिल्या दहा पैकी तीन कंपन्यांच्या बाजारमूल्यामध्ये ७३,६३० कोटी रुपयांची घसरण झाली आहे.

प्रसाद गो. जोशी

जगभरामध्ये मंदीची शक्यता वर्तविली जात असताना शेअर बाजारामध्येही अस्थिरता असण्याची शक्यता आहे. याच काळामध्ये गुंतवणूकदारांना आपला पोर्टफोलिओ मजबूत करण्याची संधी आहे. आगामी सप्ताहामध्ये भारताच्या उद्योग विश्वाशी संबंधित आकडेवारी, परकीय वित्तसंस्थांची भूमिका, रुपयाची वाटचाल, जगभरातील घडामोडींवर बाजाराची वाटचाल अवलंबून आहे. गतसप्ताहामध्ये बाजारात चांगली उलाढाल झाली. सेन्सेक्स सुमारे १८० अंशांनी वाढून ५२,९००च्या पुढे गेला आहे.

विदेशी गुंतवणूकदारांची गळती का थांबेना?  परकीय वित्तसंस्थांकडून भारतामधून पैसे काढून घेणे सुरूच आ्हे. जून महिन्यात या संस्थांनी ५०,२०३ कोटी रुपये भारतामधून काढून घेतले. या संस्थांनी पैसे काढून घेतल्याचा हा सलग नववा महिना आहे. जून महिन्यात या संस्थांनी काढून घेतलेली रक्कम ही दोन वर्षांमध्ये एका महिन्यांत काढून घेतलेली सर्वाधिक रक्कम आहे. सन २०२२च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये या संस्थांनी २.२ लाख कोटी रुपय काढून घेतले आहेत. याआधी सन २००८मध्ये वर्षभरामध्ये या संस्थांनी ५२,९८७ कोटी रुपयांची रक्कम काढलेली आहे. 

कोणत्या कंपनीचे सर्वाधिक नुकसान?शेअर बाजारातील पहिल्या दहा पैकी तीन कंपन्यांच्या बाजारमूल्यामध्ये ७३,६३० कोटी रुपयांची घसरण झाली आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजला सर्वाधिक धक्का बसला आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर आणि आयसीआयसीआय बँक या नुकसान सोसावे लागलेल्या अन्य दोन कंपन्या आहेत.

 

टॅग्स :शेअर बाजार