Join us
Daily Top 2Weekly Top 5

लय भारी! वजन कमी केल्यास मिळणार १५ दिवसांचा अधिक पगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 07:30 IST

झेरोधाचे संस्थापक व सीईओ नितीन कामत यांनी जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने विशेष भेट देताना २५ पेक्षा कमी बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) असणाऱ्या कर्मचाऱ्यांना अर्ध्या महिन्याच्या वेतनाएवढा घसघशीत बोनस देण्याची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली :

झेरोधाचे संस्थापक व सीईओ नितीन कामत यांनी जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने विशेष भेट देताना २५ पेक्षा कमी बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) असणाऱ्या कर्मचाऱ्यांना अर्ध्या महिन्याच्या वेतनाएवढा घसघशीत बोनस देण्याची घोषणा केली आहे. जे वजन घटवतील त्या कर्मचाऱ्यांनाही लाभ देण्याची घोषणा त्यांनी केली आहे.

कामत यांनी समाजमाध्यमावर पोस्ट करून आपल्या पुढाकाराची माहिती दिली. त्यांनी म्हटले की, आपल्या टीमचा सरासरी बीएमआय २५.३ आहे. तो ऑगस्टपर्यंत २४ वर आल्यास प्रत्येक कर्मचाऱ्यास अर्ध्या महिन्याच्या वेतनाएवढा बोनस मिळेल.

ज्ञात असावे की, २५ पेक्षा कमी आणि १८.५ पेक्षा जास्त बीएमआय असल्यास व्यक्तीचे वजन आरोग्यदायी असल्याचे समजले जाते. १८.५ पेक्षा कमी आणि २५ पेक्षा जास्त बीएमआय प्रकृतीसाठी घातक समजला जातो.

अनेकांकडून विराेधकामत यांच्या या अनोख्या योजनेला नेटकऱ्यांनी मात्र विरोध दर्शविल्याचे दिसून आले आहे. अशा पुढाकारामुळे लोकांच्या मनात लठ्ठपणाबाबत भीती आणि न्यूनगंड निर्माण होईल तसेच इतरही शारीरिक प्रश्न त्यातून निर्माण होण्याची भीती आहे, अशी टीका नेटकऱ्यांनी केली आहे.