Join us
Daily Top 2Weekly Top 5

या आठवड्यात बँका राहणार तीन दिवस बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 05:08 IST

भारतातील बहुतांश राज्यांत या आठवड्यात बँका तीन दिवस बंद राहतील. या आठवड्यात ईद-ए-मिलाद व गुरुनानक जयंतीच्या दोन सुट्या तर नंतर महिन्यातील चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील.

नवी दिल्ली : भारतातील बहुतांश राज्यांत या आठवड्यात बँका तीन दिवस बंद राहतील. या आठवड्यात ईद-ए-मिलाद व गुरुनानक जयंतीच्या दोन सुट्या तर नंतर महिन्यातील चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील. काही राज्यांत दोन दिवस तर काही ठिकाणी एकच दिवस सुटी राहील.नवी दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरू या शहरांत निगोसिएबल इन्स्ट्रूमेंट अ‍ॅक्ट अन्वये २१ नोव्हेंबर रोजी ईद-ए-मिलादची सुटी आहे. २३ नोव्हेंबरला बँकांना गुरुनानक जयंतीची सुटी राहील. अशा प्रकारे बुधवार, शुक्रवार व शनिवारी असे तीन दिवस बँका सुट्यांनिमित्त बंद राहतील. मुंबईसह उर्वरित महाराष्ट्र तसेच नवी दिल्ली, हैदराबाद, रायपूर, श्रीनगर, देहरादून, जम्मू, श्रीनगर, कानपूर व लखनौ (उत्तर प्रदेश) या शहरांत या सुट्या राहतील. अहमदाबाद (गुजरात), बंगळुरू (कर्नाटक), भोपाळ (मध्यप्रदेश) व चेन्नई (तामिळनाडू) या राज्यांत केवळ बुधवार व शनिवार असे दोनच दिवस सुटी राहील. चंदीगड, गुवाहाटी, जयपूर, कोलकता, शिलाँग, शिमलामध्ये बँका केवळ शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस बंद राहतील.

टॅग्स :बँक