Join us  

नोव्हेंबरपासून लग्नसराईला होणार पुन्हा प्रारंभ; डामडौल राहणार कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 6:36 AM

कोरोनाच्या पश्चात लग्नांसाठी १०० व्यक्तींना सरकारने परवानगी दिली असल्याने आता लग्नांना पूर्वीसारखी गर्दी होणार नसली तरी गेल्या सहा महिन्यांपासून जवळपास थांबलेली लग्ने पुन्हा सुरू होणार आहेत.

मुंबई : कोरोनाच्या साथीमुळे देशभर झालेल्या लॉकडाऊनचा फटका लग्नांना बसला असून, गेल्या हंगामात लग्नांची संख्या रोडावली. पुढील महिन्यापासून लग्नाचे मुहूर्त असून, आता पुन्हा लग्नसराई जोर धरणार आहे. भारतात दरवर्षी लग्नांवर सुमारे ५० अब्ज डॉलरचा खर्च होत असतो. कोरोना पश्चातच्या काळात काही प्रमाणात लग्नांची भव्यता कमी होणार असली तरी एकूणच बाजारातील चलनवलन वाढणार आहे.कोरोनाच्या पश्चात लग्नांसाठी १०० व्यक्तींना सरकारने परवानगी दिली असल्याने आता लग्नांना पूर्वीसारखी गर्दी होणार नसली तरी गेल्या सहा महिन्यांपासून जवळपास थांबलेली लग्ने पुन्हा सुरू होणार आहेत. नोव्हेंबर महिन्यापासून लग्नाचे मुहूर्त असून, त्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम असल्याने गर्दी टाळली जाणार आहे. त्यामुळेच काहीजण डेस्टिनेशन वेडिंगचे प्लॅनिंग करताना दिसत आहेत.बदलत्या काळानुसार काहीजण झूम मिटिंगच्या माध्यमातून तसेच सोशल मीडियाचा वापर करून आपले लग्न हे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र ही संख्या खूपच कमी आहे. पारंपरिक पद्धतीने लग्न साजरे करण्याकडेच सर्वांचा कल दिसतो.५० अब्ज डॉलरची होते उलाढाल- भारतात दरवर्षी लग्नाच्या हंगामामध्ये सुमारे ५० अब्ज डॉलरची उलाढाल होत असल्याचा अंदाज आहे. लग्नामुळे अनेक व्यवसायांनाही चालना मिळत असून, त्यांच्याकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतात. अनेक व्यक्ती आणि संस्था यावर अवलंबून असून, अनेकांचे संसारही त्यावरच चालत असतात. लग्नसराई पुन्हा सुरू झाल्यास या अनेक व्यवसायांनाही उभारी मिळण्याची शक्यता दिसून येत आहे.- लग्न जुळविणाऱ्या विविध संस्थांच्या मते अनेक मुला-मुलींना आता आपले लग्न लवकर उरकण्याची घाई दिसून येते. त्याचप्रमाणे लक्झरी हॉटेल तसेच ड्राइव्ह इन यासारख्या पॉश ठिकाणी लग्न करण्यासाठीच्या विचारणा सुरू झाल्या असल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :लग्नव्यवसाय