नवी दिल्ली : रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करून भारत, चीन आणि ब्राझिल हे देश ‘रक्ताच्या पैशा’तून नफेखोरी करीत आहेत. होय, तुम्ही जगाच्या विरोधात जाऊन रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करीत आहात. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे तुमच्या या खेळाला कंटाळले आहेत. तुम्ही हे तेल खरेदी करून युद्धाला हातभार लावणे सुरूच ठेवले तर आम्ही तुमची अर्थव्यवस्था चिरडून टाकू, असा इशारा ट्रम्प यांचे सहकारी सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी दिला आहे. त्यांनी पुतीन यांनाही अशीच धमकी दिली आहे.
भारत-अमेरिका व्यापार कराराचे भवितव्य धूसर भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार १ ऑगस्टच्या मुदतीपूर्वी होण्याची शक्यता धूसर बनली असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. कृषी, डेअरी उत्पादनांच्या मुद्द्यावर व्यापार कराराच्या वाटाघाटी अडल्या असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. ज्ञात असावे की, ट्रम्प यांनी भारतावर २६ टक्के टॅरिफ लादले असून, त्यास १ ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली आहे. त्याआधी व्यापार करार न झाल्यास हे टॅरिफ लागू होतील. भारताने अमेरिकेची कृषी उत्पादनांवरील टॅरिफ कमी करण्यास नकार दिला आहे.
भारत, चीन, ब्राझिलवर १००% टॅरिफ लावण्याची तयारीग्रॅहम यांनी सांगितले की, रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या भारत, चीन व ब्राझिलविरुद्ध १०० टक्के टॅरिफ लावण्याची तयारी ट्रम्प प्रशासन करीत आहे. मॉस्कोसोबत व्यापार करून हे देश युक्रेन युद्धात तेल ओतण्याचे काम करीत आहेत.