Join us

हुडहुडी वाढताच गिझर, रूम हीटर झाले महाग; गेल्या वर्षीच्या तुलनेत किमती १०% अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 07:52 IST

थंडी वाढताच देशातील गिझर, रूम हीटर व ब्लोअर यांचा बाजार गरम झाला आहे. या वस्तूंच्या किमतीही गेल्या वर्षाच्या तुलनेत १० टक्के वाढल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: थंडी वाढताच देशातील गिझर, रूम हीटर व ब्लोअर यांचा बाजार गरम झाला आहे. या वस्तूंच्या किमतीही गेल्या वर्षाच्या तुलनेत १० टक्के वाढल्या आहेत.  १५ लिटरच्या गिझरला सर्वाधिक मागणी असून रूम हीटरची विक्री अजून थोडी कमी आहे. थंडी जसजशी वाढेल, तसतशी मागणीही वाढेल. 

दिल्लीच्या बाजारात १५ लिटर, २५ लिटर आणि ३५ लिटर असे ३ प्रकारचे गिझर उपलब्ध आहेत. यंदा आधुनिक फिचरसह गिझर बाजारात आले आहेत. त्यामुळे किमती वाढल्या आहेत. ६ हजार रुपयांपासून १५ हजार रुपयांपर्यंत गिझर विकले जात आहेत. 

दिल्लीच्या कमला नगर मार्केटमधील व्यावसायिक विकास तनेजा यांनी सांगितले की, ऑइल हीटर आणि इलेक्ट्रिक हीटर अशा २ प्रकारांत हीटर उपलब्ध आहेत. 

कार्बन हीटरला मागणी 

कमला मार्केटमधील एका व्यावसायिकाने सांगितले की, यंदा कार्बन हीटर लोकांच्या पसंतीस उतरले आहेत. त्याची किंमत १,२०० रुपये आहे. अन्य हिटरची किंमत २०० रुपये ते १,५०० रुपये आहे.

 

टॅग्स :व्यवसाय