Join us

कोरोनाशी युद्ध : बीएसएनएलची महिनाभरासाठी फ्री ब्रॉडबँड सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 05:57 IST

भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) आपल्या सगळ्या लँडलाइन ग्राहकांना एक महिन्यासाठी फ्री ब्रॉडबँड सेवा सुरू केली आहे.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : कोरोनाशी लढण्यासाठी लोकांनी मोठ्या संख्येने घरी बसून काम करावे आणि विद्यार्थ्यांनी घरीच अभ्यास करावा यासाठी भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) आपल्या सगळ्या लँडलाइन ग्राहकांना एक महिन्यासाठी फ्री ब्रॉडबँड सेवा सुरू केली आहे. यासाठी एक अट अशी की, त्या ग्राहकाकडे आधीपासून इतर कोणत्याही कंपनीची ब्रॉडबँड जोडणी असायला नको.बीएसएनएलचे सीएफए विवेक बंजाल म्हणाले की, या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना टोल फ्री नंबर १८००३४५१५०४ वर कॉल करावा लागेल. बंजाल यांनी सांगितले की, हे पाऊल सोशल डिस्टन्सिंग निर्माण करण्याच्या उद्देशाने उचलले गेलेले पाऊल आहे. त्यांनी कार्यालयांत न जाता घरूनच काम करावे. शाळांनाही सुट्या आधीच जाहीर झालेल्या आहेत. गर्दी न करण्याचे आवाहन अंमलात आण, असे बंजाल म्हणाले.

टॅग्स :बीएसएनएलकोरोना वायरस बातम्या