Join us  

विना हाॅलमार्किंगचे जुने साेने विकायचे आहे का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 6:10 AM

जुने साेने देऊन नवे दागिने कसे घ्यावेत, असा प्रश्न पडताे. 

नवी दिल्ली : सध्या लग्नसाेहळ्यांचा हंगाम जाेरात सुरू आहे. लग्न म्हटले की, साेन्याच्या दागिन्यांची खरेदी आलीच. अनेकांकडे काही पिढ्यांपासून किंवा काही दशकांपासूनचे जुने साेने जमा असते. जुने दागिने अलीकडच्या काळात काेणी पसंत करीत नाहीत. आजकाल नियमांनुसार दागिन्यांवर हाॅलमार्किंग करणे बंधनकारक आहे. अशा वेळी जुने साेने देऊन नवे दागिने कसे घ्यावेत, असा प्रश्न पडताे. 

हाॅलमार्किंग म्हणजे काय?nसाेन्याच्या शुद्धतेचे प्रमाणीकरण म्हणजे हाॅलमार्किंग. nजुन्या काळात शुद्धतेचे प्रमाणीकरण नव्हते. त्यामुळे ते विकून नवे दागिने घेताना अडचण हाेते.nअनेकदा ग्राहकांची फसवणूकही हाेते.

काय करावे?nजुने दागिने असल्यास त्यांचे हाॅलमार्किंग करून घ्यावे. विकण्यापूर्वी हे आवश्यक आहे. nसरकारने १ एप्रिल २०२३ पासून साेन्याचे दागिने खरेदी आणि विक्रीसाठी ६ आकडी हाॅलमार्क नंबर सक्तीचा केला आहे. n‘बीआयएस’तर्फे साेन्याच्या शुद्धतेची तपासणी हाेते आणि त्यावर आधारित हाॅलमार्किंग काेड दागिन्यांवर टाकते.

जुन्या दागिन्यांची हाॅलमार्किंग कशी करावी?nही प्रक्रिया साेपी आहे. तुमच्या शहरातील किंवा जवळच्या ‘बीआयएस’ हाॅलमार्किंग केंद्राची माहिती घ्या. बीआयएसच्या वेबसाइटवर ही माहिती मिळेल.nया केंद्रांवर तीन पातळ्यांवर शुद्धता तपासण्यात येते. 

 

टॅग्स :सोनंदिल्लीदागिने