Join us  

स्वस्त घर विकत घ्यायचंय? तयार राहा, आली खास संधी; ही बँक करतेय लिलाव!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2023 3:30 AM

PNB चा हा मेगा लिलाव 20 जुलै 2023 रोजी होईल. यापूर्वी ६ जुलै रोजीही पीएनबीने एक ई-लिलाव केला होता.

जर आपण स्वस्तातील घर विकत घेण्याचा विचार करत असाल तर पंजाब नॅशनल बँकेने आपल्यासाठी खास ऑफर आणली आहे. बँकेच्या या ऑफरचा लाभ कोणीही घेऊ शकते. PNB लवकरच एका ई-ऑक्शनच्या माध्यमाने निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, कृषी मालमत्ता आणि सरकारी मालमत्तांचा लिलाव करणार आहे. यासंदर्भात पीएनबीने ट्विट करून माहिती दिली आहे. PNB चा हा मेगा लिलाव 20 जुलै 2023 रोजी होईल. यापूर्वी ६ जुलै रोजीही पीएनबीने एक ई-लिलाव केला होता.

का होतोय लिलाव? -जे लोक कर्जाच्या रकमेची परतफेड करू शकले नाही, अशा लोकांकडून पैशांची वसुली करण्यासाठी PNB त्यांच्या मालमत्तेचा लिलाव करणार आहे. म्हणजेच, डिफॉल्ट मालमत्तांचा लिलाव होणार आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, या ऑक्शनमध्ये 11,374 निवासी, 2,155 व्यावसायिक, 1,133 औद्योगिक, 98 कृषी आणि 34 सरकारी प्रॉपर्टीजचा लिलाव करण्यात येणार आहे. या ऑक्शनमध्ये सहभागी होण्याची इच्छा असलेले लोक आधिकृत वेबसाइट https://ibapi.in वर जाऊन यासंदर्भात अधिक माहितीत घेऊ शकता. 

ऑक्शनची पद्धत -बँकेच्या या ई-ऑक्शनमध्ये भाग घेऊ इच्छिनाऱ्यांना संपत्तीसाठी अर्नेस्ट मनी (EMD) जमा करावा लागेल. यासाठी KYC डॉक्यूमेंट्सदेखील दिखवावे लागतील. यासाठी डिजिटल स्वाक्षरीची आवश्यकता असेल. एवढे केल्यानंतर, संबंधित व्यक्तीस ऑक्शनसाठी ईमेल आयडीवर लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळतो.

खरे तर, लोक लोन घेण्यासाठी बँकेकडे रेसिडेंसियल अथवा कमर्शिअल प्रॉपर्टी गहान ठेवतात. अशा परिस्थितीत ती व्यक्ती जेव्हा पैशांची परत फेड करू शकत नाही, तेव्हा बँक त्यांची संपत्ती विकून आपली रक्कम वसूल करते.

टॅग्स :पंजाब नॅशनल बँकसुंदर गृहनियोजनबँक