पहिली गुंतवणूक करणे, कर्ज फेडण्यास सुरुवात करणे किंवा निवृत्तीचे नियोजन करणे अतिशय अवघड असते. मात्र याची एकदा सुरुवात झाली की पुढचा मार्ग सोपा होतो.
समजा, एक व्यक्ती वयाच्या ३०व्या वर्षी १०,००० चा मासिक एसआयपी सुरू करते आणि दुसरी व्यक्ती वयाच्या ४०व्या वर्षी सुरू करते. १२% वार्षिक परतावा देऊन, पहिल्या व्यक्तीकडे ३० वर्षांत ३.५३ कोटींचा निधी असेल. दुसऱ्या व्यक्तीकडे २० वर्षांत ९९ लाखांचा निधी असेल. याचा अर्थ फक्त १० वर्षे आधी सुरुवात केल्याने २.५ कोटी जास्त मिळतील.
धैर्य असे शिकाल : समजा एकाने शेअर बाजारात एक लाख रुपये गुंतविले. पहिल्या वर्षी बाजार २०% घसरला आणि त्याचे पैसे ८०,००० रुपयांपर्यंत कमी झाले.
जर त्याने घाबरून पैसे काढले तर त्याचे पैसे कमी होतील. मात्र, जर त्याने धीर धरला आणि पुढच्या वर्षी बाजार २५% वाढला तर तो त्याचे नुकसान भरून काढेल.