Join us  

Cleartrip कंपनी Flipkart च्या 'शॉपिंग कार्ट'मध्ये; अधिग्रहणासाठी चर्चा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2021 11:30 AM

Flipkart : सध्या क्लिअर ट्रिपमधील मोठा हिस्सा खरेदी करण्याची फ्लिपकार्टची चर्चा सुरू

ठळक मुद्देसध्या क्लिअर ट्रिपमधील मोठा हिस्सा खरेदी करण्याची फ्लिपकार्टची चर्चा सुरू२०१८ मध्ये वॉलमार्टकडून फ्लिपकार्टचं अधिग्रहण

ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट ऑनलाईन ट्रॅव्हल अॅग्रीगेटर क्लिअर ट्रिपमध्ये कंट्रोलिंग स्टेक खरेदी करण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात फ्लिपकार्ट आणि क्लिअर ट्रिपची चर्चाही सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या माध्यमातून फ्लिपकार्ट ट्रॅव्हल सेगमेंटमध्ये आपलं स्थान निर्माण करू पाहत आहे. फ्लिपकार्ट या कंपनीचा मालकी हक्क अमेरिकेतील दिग्गज कंपनी वॉलमार्टकडे आहे. फ्लिपकार्ट आणि क्लिअर ट्रिप यांच्यातील व्यवहाराचा उद्देश MakeMyTrip, Yatra, Booking.com आणि EaseMyTrip सारख्या दुसऱ्या देशांतर्गत ट्रॅव्हल अॅग्रीगेटर कंपन्यांच्या तुलनेत स्थिती उत्तम करणं हे आहे. मनी कंट्रोलनं सूत्रांच्या हवाल्यानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. काही महिन्यांपूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला होता. परंतु आता पुन्हा एकदा अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे. अशातच आता लोकांनीही आपल्या घराबाहेर पडण्यास सुरूवात केली आहे. या बदलत्या वातावरणाचा कंपनी फायदा घेण्याच्या तयारीत आहे. फ्लिपकार्टची क्लिअर ट्रिपमध्ये मेजॉरिटी हिस्स्यासाठी चर्चा सुरू आहे. परंतु हा व्यवहार पूर्ण होईलच याची खात्री नसल्याची माहिती सूत्रांनी मनी कंट्रोलशी बोलताना दिला. हा फ्लिपकार्टच्या व्यावसायीक रणनितीचा भाग आहे. तसंच कंपनी जास्तीतजास्त ग्रॉस मर्चंट व्हॅल्यू तयार करू पाहत असल्याचंही सूत्रांनी सांगितलं. जर हा व्यवहार पूर्ण झाला तर या काळात याकडे अपॉर्च्युनिस्टीक अधिग्रहण म्हणून पाहिलं जाईल.२०१८ मध्ये वॉलमार्टकडून फ्लिपकार्टचं अधिग्रहणFlipkart, Amazon आणि Paytm सारख्या मोठ्या ई कॉमर्स कंपन्या सुपर अॅप स्ट्रॅटजीवर काम करत आहेत आणि बिझनेस सेगमेंटमध्ये मग फूड डिलिव्हरी, रिटेल, पेमेंट सर्व्हिसेस आणि ट्रॅव्हल अशा कोणत्याही क्षेत्रात आपली उपस्थिती दाखवू इच्छित आहेत. याच माध्यमातून ऑनलाईन ट्रॅव्हल अॅग्रीगेटर क्लिअर ट्रिप फ्लिपकार्टच्या शॉपिंग लिस्टमध्ये सामिल आहे. २०१८ मध्ये वॉलमार्टनं १६ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करत फ्लिपकार्टमधील ७७ टक्के हिस्स्याचं अधिग्रहण केलं होतं. सध्या फ्लिपकार्टची अॅमेझॉन ही मोठी स्पर्धक कंपनी आहे. 

टॅग्स :फ्लिपकार्टअ‍ॅमेझॉनभारतपे-टीएम