Join us  

वेटिंगवर आहात? ‘टीसी’मागे फिरावे लागणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 9:45 AM

तुमच्या हातात कन्फर्म तिकीट नसेल तर रेल्वे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप हाेताे. गाडीत टीसीच्या मागे फिरावे लागते.

नवी दिल्ली : तुमच्या हातात कन्फर्म तिकीट नसेल तर रेल्वे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप हाेताे. गाडीत टीसीच्या मागे फिरावे लागते. मात्र, आता प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. काेणत्या डब्यात किती जागा रिकाम्या आहेत, ही माहिती प्रवाशांना चार्ट तयार झाल्यानंतर मिळणार आहे. यासाठी आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर नवी सुविधा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 

नवी सुविधा सुरू झाल्यानंतर प्रवाशांना माेबाइलवर रिक्त जागांची यादी उपलब्ध हाेणार आहे. आयआरसीटीसीवरून आरक्षित तिकिटे घेतानाच ‘गेट ट्रेन चार्ट’ हा पर्याय निवडण्याचा पर्याय मिळेल.

मंदीच्या भीतीने तब्बल ३४.२२ टन सोने खरेदी

नवी सुविधा सुरू झाल्यानंतर आयआरसीटीसीकडून आलेल्या एसएमएसमधील लिंकवर क्लिक केल्यास चार्ट मिळू शकेल. या सुविधेसाठी किती शुल्क लागेल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. शुल्क आकारल्यास ५ ते १० रुपयांपेक्षा जास्त राहणार नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

सध्या वेबसाइटवरच सुविधा 

सध्या आआरसीटीसीच्या वेबसाइटवर ट्रेनचा चार्ट मिळविण्याची सुविधा आहे. मात्र, माेबाइलवर ही माहिती मिळत नाही. त्यामुळे प्रवासी टीसीवर अवलंबून असतात. 

टॅग्स :रेल्वे