Join us  

रुपया सुधारण्यासाठी भाजपाच्या ‘अच्छे दिन’ची वाट पाहतोय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 3:01 AM

रुपयाच्या घसरगुंडीमुळे कोंडीत सापडलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला माजी वित्तमंत्री पी.चिदंबरम यांनी जबरदस्त कोपरखळी मारली आहे.

नवी दिल्ली : रुपयाच्या घसरगुंडीमुळे कोंडीत सापडलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला माजी वित्तमंत्री पी.चिदंबरम यांनी जबरदस्त कोपरखळी मारली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात, तसेच विजयानंतर भाजपाने घोषणा केलेले अच्छे दिन रुपयाच्या वाट्याला कधी येतात, याची मी प्रतीक्षा करीत आहे, असा टोला चिदंबरम यांनी शुक्रवारी लगावला.भाजपाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीआधी आपले सरकार आल्यानंतर देशात ‘अच्छे दिन’ येणार असल्याची जाहिरात मोहीम राबविली होती. ही निवडणूक भाजपानेजिंकली आणि नरेंद्र मोदी पंतप्रधानही झाले. ‘अच्छे दिन’ची घोषणामात्र अलीकडे सरकार विरोधातच मोठ्या प्रमाणात वापरली जातआहे. गेले दोन दिवस रुपयाची विक्रमी घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया आतापर्यंतच्या सार्वकालिक नीचांकावर गेलाआहे. त्यावरून मोदी सरकारवर टीकेची झोड उठविली जात आहे. समाजमाध्यमांतून सातत्याने सरकारवर बोचरी टीका होत आहे.या पार्श्वभूमीवर चिदंबरम यांनी आपल्या टिष्ट्वटमध्ये म्हटले की, ‘एक डॉलरची किंमत ४० रुपये होऊन, अच्छे दिन कधी येतात, याची मी वाट पाहत आहे!’ डॉलर्सच्या तुलनेत२0१४ साली रुपया घसरल्यानंतर भाजपाने एक व्हिडीओ जारी केला होता. तोच व्हिडीओ काँग्रेसने आज प्रसारित केला आणि डॉलरवरून भाजपाची कॉलर धरली

टॅग्स :काँग्रेसभाजपा